मुंबई : नागरिकांची क्रयशक्ती दुप्पट होत आहे. जगातील सर्वात मोठी बाजारपेठ व जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असलेल्या भारतात येणारा काळ हा विक्री क्षेत्राचा असेल. या पार्श्वभूमीवर कामगार कायद्यात १० प्रमुख बदल केल्यास देशात येत्या तीन वर्षांत विक्री क्षेत्रात तब्बल १ कोटी नोकऱ्या निर्माण होतील, असे मत टीमलीज सर्व्हिसेसच्या सह संस्थापिका व कार्यकारी उपाध्यक्ष रितूपर्णा चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.नोकºयांसंदर्भात विविध सर्वेक्षण करणाºया ‘टीमलीज’ने नुकतेच ‘सेल्स’ श्रेणीतील नोकºयांचे सर्वेक्षण केले. त्याची माहिती चक्रवर्ती यांनी प्रसारमाध्यमांना दिली.या अहवालात म्हटले आहे की, विविध ४४ कामगार कायद्यांचे चार प्रकारच्या कामगार नियमावलीत रूपांतर करणे, युनिक व्यवसाय क्रमांक, कर्मचाºयांना वेतनश्रेणी निवडीची सोय देणे, कारखाने सुधारणा विधेयक, कंत्राटी कामगार कायद्यात सुधारणा, असे दहा बदल केल्यास भविष्यात १ कोटी नोकºया सहज उपलब्ध होऊ शकतील. कायद्यात सुधारणा न केल्यास तीन वर्षात किमान २५ लाख नोकºया निर्माण होतील. कुठल्याही सुधारणांविना तीन वर्षांत सुपर मार्केट-मॉलमध्ये ५८.२२ टक्के (१२.६२ लाख), ग्राहकोपयोगी क्षेत्रात ३२.९६ टक्के (७.३५ लाख) नोकºया उपलब्ध होणार आहेत.
सेल्समध्ये १ कोटी तरुणांना नोकरीच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 5:30 AM