Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio चा एक प्लॅन आणि वर्षभर मिळेल अनलिमिटेड कॉलिंग, डेटा; पाहा स्वस्त आणि मस्त रिचार्ज

Jio चा एक प्लॅन आणि वर्षभर मिळेल अनलिमिटेड कॉलिंग, डेटा; पाहा स्वस्त आणि मस्त रिचार्ज

रिलायन्स जिओकडे अनेक स्वस्त आणि महाग अशा प्रीपेड प्लॅनची ​लिस्ट आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 03:41 PM2023-04-18T15:41:48+5:302023-04-18T15:43:16+5:30

रिलायन्स जिओकडे अनेक स्वस्त आणि महाग अशा प्रीपेड प्लॅनची ​लिस्ट आहे.

One plan of reliance Jio and get unlimited calling data for a year Check out cheap and cool recharges compete to airtel vodafone idea | Jio चा एक प्लॅन आणि वर्षभर मिळेल अनलिमिटेड कॉलिंग, डेटा; पाहा स्वस्त आणि मस्त रिचार्ज

Jio चा एक प्लॅन आणि वर्षभर मिळेल अनलिमिटेड कॉलिंग, डेटा; पाहा स्वस्त आणि मस्त रिचार्ज

रिलायन्स जिओकडे अनेक स्वस्त आणि महाग अशा प्रीपेड प्लॅनची ​लिस्ट आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला असेच काही प्लॅन्स सांगणार आहोत, ज्यानं रिचार्ज करून तुम्ही वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाचा लाभ घेऊ शकता. आता तुम्ही विचार करत असाल की असा कोणता प्लॅन आहे जो वर्षभर सर्व ऑफर करत आणि त्याची किंमतही कमी आहे.

जिओचा 2545 रुपयांचा रिचार्ज तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनची ​​वैधता 336 दिवसांची आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभही घेता येतो. दरम्यान, या रिचार्जमध्ये तुम्हाला एकूण 504GB डेटा दिला जात आहे. यासोबतच 5G डेटा देखील देण्यात येत आहे. 

Jio 2999 Recharge
तुम्ही जिओचा 2999 रुपयांचा रिचार्ज देखील सहज खरेदी करू शकता. या प्लॅनमध्येही तुम्हाला अनेक बेनिफिट्स दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला 388 दिवसांची म्हणजेच सुमारे 13 महिन्यांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो. अशा प्रकारे, या प्लॅनमध्ये एकूण 912.5 GB डेटा उपलब्ध आहे. 

या प्लॅनमध्ये यूजर्स अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसची सुविधादेखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शनही देण्यात येतंय.

Web Title: One plan of reliance Jio and get unlimited calling data for a year Check out cheap and cool recharges compete to airtel vodafone idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.