Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपयाची भरपाई

कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपयाची भरपाई

मोबाईलवरील कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता कॉल ड्रॉपसाठी ग्राहकाला प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दूरसंचार नियामक प्राधीकरणाने दिले

By admin | Published: October 16, 2015 10:21 PM2015-10-16T22:21:23+5:302015-10-16T22:21:23+5:30

मोबाईलवरील कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता कॉल ड्रॉपसाठी ग्राहकाला प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दूरसंचार नियामक प्राधीकरणाने दिले

One rupee compensation if call drop | कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपयाची भरपाई

कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपयाची भरपाई

मुंबई : मोबाईलवरील कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता कॉल ड्रॉपसाठी ग्राहकाला प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दूरसंचार नियामक प्राधीकरणाने दिले. या आदेशाची अंमलबजावणी येत्या १ जानेवारी २०१६ पासून होणार आहे. कॉल ड्रॉपकरिता भरपाई देण्याची एका दिवसातील कमाल मर्यादा ही तीन कॉल्सची असेल.
कॉल ड्रॉपच्या तक्रारींत सातत्याने वाढ झाल्यानंतर आॅगस्ट महिन्यांत स्वत: पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घालत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सरकारने वेळोवेळी सेवा सुधार करण्यासंदर्भात कंपन्यांना निर्देश दिले होते. तरीही या समस्येचे निराकरण झालेले नाही. या पार्श्वभूमीवर आता या कंपन्यांना भरपाई देण्याची नवी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. ट्रायच्या आदेशानुसार, एका दिवसात जरी कितीही कॉल ड्रॉप झाले असले तरी ग्राहकाला तीन कॉलची भरपाई मिळेल. याचाच अर्थ, तीन रुपये मिळतील व हे तीन रुपये त्याच्या बिलाच्या रकमेत सामावून घेत बिल दिले जाईल. बिलामध्ये कॉल ड्रॉपच्या भरपाईचा उल्लेखही होईल. कंपन्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: One rupee compensation if call drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.