Lokmat Money > बिझनेस न्यूज > श्रीमंतांच्या यादीत झुकेरबर्गचे एक पाऊल पुढे, अंबानी १३ व्या स्थानी

श्रीमंतांच्या यादीत झुकेरबर्गचे एक पाऊल पुढे, अंबानी १३ व्या स्थानी

तर पहिल्या आणि दहाव्या क्रमांकावर फ्रान्सचे उद्याेगपती आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 10:07 AM2023-04-29T10:07:09+5:302023-04-29T10:07:20+5:30

तर पहिल्या आणि दहाव्या क्रमांकावर फ्रान्सचे उद्याेगपती आहेत. 

One step ahead of Zuckerberg in the rich list, Ambani is at 13th place | श्रीमंतांच्या यादीत झुकेरबर्गचे एक पाऊल पुढे, अंबानी १३ व्या स्थानी

श्रीमंतांच्या यादीत झुकेरबर्गचे एक पाऊल पुढे, अंबानी १३ व्या स्थानी

नवी दिल्ली : फेसबुकची पालक कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून अब्जाधीशांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टॉप १० मधून मुकेश अंबानी बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे, जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या १० पैकी ८ अब्जाधीश अमेरिकेतील आहेत. तर पहिल्या आणि दहाव्या क्रमांकावर फ्रान्सचे उद्याेगपती आहेत. 

ब्लूमबर्ग बिलियनिअर्स इंडेक्सनुसार फ्रान्समधील लुई वुईटन या कंपनीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची १७.१० लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. 

ब्लुमबर्ग अब्जाधीश निर्देशांक
मेटाच्या समभागातील तेजीनंतर  झुकेरबर्ग यांनी अंबानी यांना मागे टाकून १२ वे स्थान पटकावले. आधी झुकेरबर्ग १३ व्या स्थानावर होते. आता अंबानी हे ८२.४ अब्ज डॉलरच्या (६.७३ लाख कोटी) संपत्तीसह १३ व्या स्थानी आले.

    बर्नार्ड अरनाॅल्ट, फ्रान्स    १७.१०
    इलाॅन मस्क, अमेरिका    १३.२४
    जेफ बेझाेस, अमेरिका    १०.८७
    बिल गेट्स, अमेरिका    ९.९७
    वाॅरेन बफे, अमेरिका    ९.४२
    लॅरी एलिसन, अमेरिका    ८.७४
स्टीव्ह बामर, अमेरिका        ८.६६
    लॅरी पेज, अमेरिका    ८.१०
    सर्गी ब्रिन, अमेरिका    ७.७४
    फ्रॅकाईस मेयर्स, फ्रान्स    ७.७३
टॉप टेन श्रीमंत : संपत्ती लाख काेटी रुपयांत

फेसबुकचा तिमाहीचा निकाल आल्यानंतर मेटाच्या समभागांत तेजी आली आहे. त्यामुळे झुकेरबर्ग यांची संपत्ती वाढली आहे. मेटाचा समभाग १३.९३ टक्क्यांनी वाढला. परिणामी झुकेरबर्ग यांची संपत्ती एका दिवसात सुमारे ८१.७७ हजार कोटी रुपयांनी वाढली. 

Web Title: One step ahead of Zuckerberg in the rich list, Ambani is at 13th place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.