एक चूक किती भारी पडू शकते याची प्रचिती आपल्याला कधी ना कधी आली असेल. असाच एक प्रकार एका बँकेसोबतही घडलाय. टायपो किती भारी पडू शकतो हे फक्त जपानच्याबँक मिझुहो सिक्युरिटीजला विचारा? जपानमधील सर्वात मोठ्या इनव्हेस्टमेंट बँकांपैकी एक असलेल्या मिझुहो सिक्युरिटीजला डिसेंबर २००५ मध्ये एका टायपोचा फटका बसला. एका ब्रोकरनं १ येन प्रति शेअरच्या हिशोबानं चुकून ६,१०,००० शेअर्स विकले, परंतु त्याला ६,१०,००० येनमध्ये १ शेअर विकायचा होता. ही चूक सुधारण्याचे प्रयत्नही अपयशी ठरले आणि बँकेला काही मिनिटांतच २२५ मिलियन डॉलर्सचा (सुमारे १८,९८,९१,२२,५०० रुपये) फटका बसला. परिस्थिती अशी झाली की बँक दिवाळखोर होण्यापासून वाचली.
मिझुहो सिक्युरिटीजसाठी काम करणाऱ्या जे-कॉम या एजन्सीला १ येन प्रति शेअर दराने ६,१०,००० शेअर्स विकायचे होते, पण त्यांनी चुकून एक येनमध्ये ६,१०,००० शेअर्स विकले. ब्रोकरला आपली चूक लक्षात येईपर्यंत खूप नुकसान झालं होतं. समस्या अशी होती की टोकियो स्टॉक एक्स्चेंजच्या कम्प्युटर सिस्टमलाही ही चूक रोखता आली नाही. ब्रोकरेज फर्म ऑर्डर रद्द करू शकली नाही. जपानच्या फायनान्शिअल सर्व्हिसेस एजन्सीनं कंपनीला भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी आपले कम्प्लायन्सेजमध्ये सुधारणा करण्यास सांगितलं.
नियामकानं काय म्हटलं?
नियामकाच्या म्हणण्यानुसार मिझुहोनं आपल्या ट्रेडर्सना पुरेसं प्रशिक्षण दिलं नव्हतं. इन्व्हेस्टमेंट बँकेनं अशा कामाची जबाबदारी अनुभवी वरिष्ठ कर्मचाऱ्याकडे द्यायला हवी होती. या एका चुकीमुळे बँकेला काही मिनिटांतच २२.५ कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे १८,९८,९१,२२,५०० रुपयांचा तोटा झाला. त्यानंतर भविष्यात अशा चुका होऊ नयेत म्हणून इन्व्हेस्टमेंट बँकेनं आपल्या कामकाजात अनेक सुधारणा केल्या आहेत.