Join us

Stock Market: एक चुकीची क्लिक आणि बुडाले तब्बल २५० कोटी, स्टॉक मार्केटमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 3:30 PM

NSE, Stock Market: कधी कधी छोटीशी चुकही महागात पडू शकते. याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. अशीच एक घटना गुरुवारी एनएसईवर ट्रेड्रिंगदरम्यान समोर आली आहे. एका ब्रोकरने केलेल्या एका चुकीच्या क्लिकमुळे सुमारे २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

नवी दिल्ली - कधी कधी छोटीशी चुकही महागात पडू शकते. याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. अशीच एक घटना गुरुवारी एनएसईवर ट्रेड्रिंगदरम्यान समोर आली आहे. एका ब्रोकरने केलेल्या एका चुकीच्या क्लिकमुळे सुमारे २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रोकरेजच्या भाषेमध्ये या प्रकाराला फॅट फिंगर ट्रेडिंग म्हणतात. यामध्ये कुणी ब्रोकर ऑर्डर प्लेस करताना चुकून की-बोर्डवर अशी की दाबतो जी त्याच्या संपूर्ण व्यवहाराचे तीन तेर वाजवून टाकते. भारतामध्ये घडलेली फॅट फिंगर ट्रेडिंगची ही सर्वात मोठी घटना आहे. अंदाजानुसार यामध्ये ब्रोकरला सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी २०१२ मध्ये ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबल ग्लोबलला अशाच प्रकारच्या एका घटनेत ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

गुरुवारी दुपारी २.३७ ते २.३९ च्या दरम्यान, निफ्टीवर ऑप्शन ट्रेडिंगवेळी एका ब्रोकरने २५ हजार लॉटसाठी बोली लावली. त्यावेळी प्रत्येक लॉटचा भाव सुमारे २१०० रुपये एवढा होता. मात्र ब्रोकरने चुकून ५० रुपये कमी भाव लावला. बाजारातील जाणकारांच्या मते ऑर्डर प्लेस होताच ब्रोकरला २०० ते २५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विश्लेषकांच्या मते ही रक्कम कुठल्याही परिस्थितीत २५० कोटींहून कमी नसेल.

एकीकडे ही ऑर्डर प्लेस करणाऱ्या ब्रोकरला एवढं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे याच  घटनेने कोलकात्यामधील दोन ब्रोकरांचा बंपर फायदा झाला आहे. एका ब्रोकरला सुमारे ५० कोटी रुपयांचा थेट लाभ तर दुसऱ्या ब्रोकरला २५ कोटींचा लाभ झाला आहे.

या घटनेबाबत एनएसईकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र एका अधिकाऱ्याने सांगतिले की, हा प्रकार दोन ब्रोकरमध्ये घडलेला असल्याने चुकून एकाला नुकसान झालं असेल तर याची भरपाई आधीपासून करून ठेवलेल्या विम्याच्या माध्यमातून केली जाईल. मात्र मात्र चुकीच्या ट्रेडिंगची ही ऑर्डर तांत्रिक जाळ्याला चुकवून कशी काय पूर्ण झाली याचा तपास केला जात आहे. 

  

टॅग्स :शेअर बाजारव्यवसायपैसा