Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक वर्ष पूर्ण : बँकांकडे अजूनही बाद नोटा पडून!

एक वर्ष पूर्ण : बँकांकडे अजूनही बाद नोटा पडून!

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी ५00 आणि १,000 रुपयांच्या बाद नोटा अजून बँकांच्या तिजोºयांत पडून आहेत. त्यामुळे बँकांचे काम वाढले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:20 AM2017-11-14T01:20:30+5:302017-11-14T01:20:45+5:30

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी ५00 आणि १,000 रुपयांच्या बाद नोटा अजून बँकांच्या तिजोºयांत पडून आहेत. त्यामुळे बँकांचे काम वाढले आहे.

 One year full: bank accounts still lying down! | एक वर्ष पूर्ण : बँकांकडे अजूनही बाद नोटा पडून!

एक वर्ष पूर्ण : बँकांकडे अजूनही बाद नोटा पडून!

पुणे : नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी ५00 आणि १,000 रुपयांच्या बाद नोटा अजून बँकांच्या तिजोºयांत पडून आहेत. त्यामुळे बँकांचे काम वाढले आहे. या नोटांची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ कामाला लावावे लागले आहे.
जुन्या नोटांची देखरेख करणाºया पुण्यातील बँकांचे कर्मचारी व अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बँकांच्या सर्व तिजोºया अजूनही जुन्या नोटांनी भरलेल्या आहेत. चलनातून बाद झालेल्या नोटा नष्ट करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे त्या सांभाळण्याचे काम बँकांना करावे लागत आहे. ही रिझर्व्ह बँकेची मालमत्ता आहे. तथापि, ही मालमत्ता व्यावसायिक बँकांच्या ताब्यात आहे. जुन्या नोटांनी तिजोºया भरलेल्या असल्यामुळे बँकांना नव्या नोटा ठेवायला जागाच नाही. त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
महाराष्टÑात रिझर्व्ह बँकेची तीन विभागीय कार्यालये आहेत. नवी मुंबईतील बेलापूर येथील कार्यालयातून पुण्यासह ११ जिल्ह्यांचा व गोव्याचा, मुंबईतील फोर्ट कार्यालयातून गुजरात, मध्य प्रदेश व छत्तीसगडचा, तर नागपूर कार्यालयातून मराठवाडा, विदर्भ यांसह छत्तीसगड व मध्य प्रदेशमधील काही जिल्ह्यांचा कारभार चालतो.
रिझर्व्ह बँकेच्या बेलापूर कार्यालयाशी १८९ बँक तिजोºया जोडलेल्या आहेत. त्यातील २९ तिजोºया पुणे जिल्ह्यातील आहेत. तिजोºयांच्या देखभालीचे काम करणाºया कर्मचाºयांनी सांगितले की, नोटाबंदीच्या काळात संपूर्ण लक्ष नव्या नोटा लोकांत वितरित करण्यावर केंद्रित होते. त्या वेळी जमा झालेल्या जुन्या नोटा बँकांकडे पडून राहिल्या; पण त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. वर्ष होऊनही नोटा इथेच पडून असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
काही अधिकाºयांनी सांगितले की, सतत पाठपुरावा केल्यामुळे आॅगस्टमध्ये रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटा उचलायला सुरुवात केली. एकेक बँकेच्या तिजोºया संपूर्ण रिकाम्या करण्याऐवजी सर्व बँकांमधील थोड्या-थोड्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून घेतल्या जात आहेत. या नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी त्या रिझर्व्ह बँकेच्या बेलापूर कार्यालयात पाठविल्या जात आहेत.

Web Title:  One year full: bank accounts still lying down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.