लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध आॅफर्सद्वारे तुलनेने स्वस्त दरातील स्मार्टफोनची आॅनलाइन विक्री करून अवघ्या तीन वर्षांत भारतीय बाजारात स्थिरावलेल्या ‘वन प्लस’ या चिनी मोबाइल कंपनीने आता टाटा उद्योग समूहाची इलेक्ट्रॉनिक वितरण साखळी असलेल्या ‘क्रोमा’शी भागीदारी केली आहे. याद्वारे देशातील आॅफलाइन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मानस वन प्लस इंडियाचे महाव्यवस्थापक विकास अगरवाल यांनी व्यक्त केला.देशभरातील बड्या महानगरांतील क्रोमाच्या १० स्टोअर्समध्ये आता वन प्लसची उत्पादने उपलब्ध झाली आहे. मंगळवारी मुंबईतील क्रोमाच्या स्टोअरमध्ये ही भागीदारी जाहीर करण्यात आली. सध्या वन प्लस ५ हा नुकताच बाजारात आणलेला स्मार्टफोन क्रोमामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्राहकांना स्मार्टफोन हाताळून पाहता यावा आणि त्याची वैशिष्ट्ये प्रत्यक्ष जाणून घेता यावीत, यासाठी ही भागीदारी विशेष उपयुक्त आहे, असे क्रोमा इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविजित मित्रा यांनी सांगितले.
स्मार्टफोनची आॅनलाइन विक्री करणा-या ‘वन प्लस’ची ‘क्रोमा’शी भागीदारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 1:38 AM