Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओएनजीसीची रशियात १५ टक्के हिस्सा खरेदी

ओएनजीसीची रशियात १५ टक्के हिस्सा खरेदी

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) रशियन सरकारच्या मालकीच्या रोझनेफ्ट व्हॅन्कोर या तेल उत्खनन प्रकल्पात १५ टक्के भागीदारी विकत घेण्याच्या

By admin | Published: September 4, 2015 10:04 PM2015-09-04T22:04:22+5:302015-09-04T22:04:22+5:30

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) रशियन सरकारच्या मालकीच्या रोझनेफ्ट व्हॅन्कोर या तेल उत्खनन प्रकल्पात १५ टक्के भागीदारी विकत घेण्याच्या

ONGC bought 15 percent stake in Russia | ओएनजीसीची रशियात १५ टक्के हिस्सा खरेदी

ओएनजीसीची रशियात १५ टक्के हिस्सा खरेदी

नवी दिल्ली : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) रशियन सरकारच्या मालकीच्या रोझनेफ्ट व्हॅन्कोर या तेल उत्खनन प्रकल्पात १५ टक्के भागीदारी विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. १.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा हा व्यवहार असून तो ओएनजीसी विदेश लिमिटेडने (ओएनजीसीचे विदेशातील व्यवहार बघणारी शाखा) वॅन्कोरनेफ्टशी केला आहे.
रोझनेफ्ट वॅन्कोर ही रशियाची दुसऱ्या क्रमांकाची तेल उत्पादक कंपनी सायबेरियात आहे. या तेल विहिरीतून दरवर्षी ३.३ दशलक्ष टनांचे उत्पादन होईल. या व्यवहाराच्या नेमक्या किमतीचा आकडा सांगण्यात आलेला नाही तरी या व्यवहाराशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओएनजीसी विदेश लिमिटेड (ओव्हीएल) १.३ अब्ज अमेरिकन डॉलर त्यासाठी मोजेल. ओव्हीएलने केलेले हे चौथे मोठे अधिग्रहण आहे. २०१३ मध्ये त्याने मोझांबिकमधील गॅस साठ्यासाठी ४.१२५ अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजले होते. २००९ मध्ये त्याने रशियाची २.१ अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजून इंपेरियल एनर्जी कंपनी विकत घेतली होती.

Web Title: ONGC bought 15 percent stake in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.