Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओएनजीसी करणार ८३ हजार कोटींची गुंतवणूक

ओएनजीसी करणार ८३ हजार कोटींची गुंतवणूक

ओएनजीसी ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय तेल कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनवाढीसाठी २५ प्रकल्पांच्या माध्यमातून ८३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 03:13 AM2019-08-16T03:13:48+5:302019-08-16T03:14:03+5:30

ओएनजीसी ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय तेल कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनवाढीसाठी २५ प्रकल्पांच्या माध्यमातून ८३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

ONGC will invest Rs 83,000 crore | ओएनजीसी करणार ८३ हजार कोटींची गुंतवणूक

ओएनजीसी करणार ८३ हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली : ओएनजीसी ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय तेल कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनवाढीसाठी २५ प्रकल्पांच्या माध्यमातून ८३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शशी शंकर यांनी ही माहिती दिली.
भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना शंकर म्हणाले की, यातील १५ प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत. त्यामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात वाढ होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकाळात १८ कोटी टन इतके उत्पादन मिळेल,
असा अंदाज आहे. कंपनीने भारतातील स्वमालकीच्या तेल विहिरीतून २०१८-१९ या आर्थिक वर्षात २.४२ कोटी टन इतके खनिज तेल आणि २५.८१ अरब घनमीटर इतक्या नैसर्गिक वायूचे उत्पादन करण्यात आले. तर कंपनीने २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत ३२ अरब घनमीटर नैसर्गिक वायूच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: ONGC will invest Rs 83,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.