लाहोर : आपल्या इतिहासातील सर्वांत मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. लाहोरमध्ये कांदे २५० रुपये किलो झाले आहेत. दूध २१३ रुपये लिटर, तांदूळ ३२८ रुपये किलो, सफरचंदे २३७ रुपये किलो आणि टोमॅटो २०० रुपये किलो झाले आहेत.
पाकिस्तानी वृत्तसंस्था ‘एआयवाय’ने दिलेल्या वृत्तानुसार, यंदा निवडणुका होत असताना महागाईने लोकांचे जगणे असह्य केले आहे. सर्वच वस्तूंचे भाव लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. साठेबाजी रोखण्याचे आदेश देशाच्या ‘आर्थिक समन्वय समिती’ने ‘राष्ट्रीय किंमत देखरेख समिती’ला गेल्या महिन्यात दिले होते. तरीही महागाई थांबलेली नाही. (वृत्तसंस्था)