नवी दिल्ली : पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर, एकीकडे बँका आणि एटीएमसमोर रांगा दिसत असल्या, तरी दुसरीकडे आॅनलाइन व्यवहार वाढल्याचेही स्पष्ट होत आहे. कॅशलेस व्यवहारांच्या कक्षाही रुंदावल्याचे दिसून येत आहे. एअरटेल मनी या अॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार वाढले आहेत. एअरटेल पेमेंट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा म्हणाले की, या व्यवहारांवर दहा टक्के कॅश बॅकची योजना जाहीर केली. पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्यावर हे अॅप डाउनलोड करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
‘आॅनलाइन’ तेजीत!
By admin | Published: November 14, 2016 1:21 AM