ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्ही Dream11, Rummy Circle किंवा Mycircle11 सारख्या इतर ऑनलाईन गेमिंग वेबसाइट्सद्वारे पैसे कमवत असाल, तर आजपासून तुमच्या नफ्याला मोठा फटका बसणार आहे. १ एप्रिलपासून ऑनलाइन गेमिंगच्या प्रत्येक कमाईवर ३० टक्के टीडीएस कापला जाणार असल्याची गोषणा या अर्थसंकल्पात केली होती. यापूर्वी, हाच टीडीएस फक्त १०,००० रुपयांपेक्षा जास्त जिंकलेल्यांवर लागू होता. आता यापुढे गेममधून जिंकलेल्या रकमेवर टीडीएस कापला जाणार आहे.
करचोरी रोखण्याचा यामागे सरकारचा हेतू आहे. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आता एखादी व्यक्तीने गेममध्ये १००० रुपये एंट्री फी भरायची आणि १२००० रुपये जिंकायचे, तर ११,००० रुपयांवर त्याचा TDS ३०% होता. त्यानुसार, त्याला त्याच्या ११,००० रुपयांच्या विजयावर ३,३०० रुपये टीडीएस भरावा लागणार आहे.
१००० रुपये एंट्री फी भरून गेममध्ये प्रवेश केला आणि ८००० रुपये जिंकले तर त्याला ७,००० रुपयांवर TDS भरावा लागेल. जर तुम्ही ७००० रुपये जिंकले तर तुम्हाला TDS म्हणून २१०० रुपये भरावे लागतील.