Join us  

ऑनलाइन पेमेंट अयशस्वी झाले, खात्यातून पैसे गेले, परतावा कसा मिळवायचा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 11:14 AM

आंतरराष्ट्रीय वेबसाइट किंवा इतर ऑनलाइन पेमेंट करताना, व्यवहार अयशस्वी होतात पण तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातात.

भारतात ऑनलाइन व्यवसाय झपाट्याने वाढला आहे, त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय वेबसाइट्स देखील भारतात उत्पादने पुरवत आहेत. तुम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड, UPI आणि इतर माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग करू शकता. ऑनलाइन पेमेंट करताना, अनेक वेळा असे घडते की व्यवहार अयशस्वी होतो आणि खात्यातून पैसे कापले जातात. यामागे अनेक कारणे असू शकतात.

तिकडे युद्धाचा इकडे सोने-चांदीचा भडका; एका दिवसात घेतली माेठी उसळी, आणखी भाववाढीची शक्यता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑक्टोबर २०२१ मध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून आंतरराष्ट्रीय पेमेंट वेबसाइट आणि ऑटो डेबिट नियमांसाठी काही सूचना जारी केल्या होत्या. यानुसार, जर आंतरराष्ट्रीय वेबसाइट आरबीआयच्या नियमांनुसार नसेल तर ती भारतीय डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून पेमेंट स्वीकारू शकत नाही. हे तुमचा व्यवहार अयशस्वी होण्याचे हे एक कारण असू शकते.

याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांवर काही मर्यादा आणि बंधने आहेत. अशा परिस्थितीत भारतीय कार्डवरून पेमेंट ब्लॉक होऊ शकते. OTP समस्या, नेटवर्क किंवा इतर समस्यांमुळे पेमेंट थांबवले जाऊ शकते. ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी, बँक सर्व व्यवहारांना परवानगी देत ​​नाही, जर संशयास्पद क्रियाकलाप असेल तर बँक व्यवहार थांबवू शकते.

आंतरराष्ट्रीय पेमेंट करताना व्यवहार अयशस्वी होतो, पण बँक खात्यातून पैसे कापले जातात, तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सहसा, काही काळानंतर बँका आपोआप खात्यातील पैसे परत करतात.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, पाच कामाच्या दिवसांत लोकांच्या खात्यात पैसे पाठवले जातात. बँकेने पाच दिवसांत पैसे न पाठवल्यास ग्राहकांच्या खात्यात दररोज १०० रुपये दंड जमा करावा लागेल.

जर आंतरराष्ट्रीय वेबसाइट भारतीय डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून पेमेंट प्रक्रिया करण्यात अयशस्वी ठरली, तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल. पर्यायी व्यवस्थांमध्ये SWIFT सेवा वापरून किंवा Skrill सारख्या अॅप्सचा वापर करून व्यापाऱ्याला थेट आंतरराष्ट्रीय बँक हस्तांतरण समाविष्ट आहे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रगुगल पे