Lokmat Money > बिझनेस न्यूज > Online Payment: ऑनलाइन पेमेंट केले; पण पैसे गेले कुठे? ऑनलाईन पेमेंट चांगला पर्याय असला तरी...

Online Payment: ऑनलाइन पेमेंट केले; पण पैसे गेले कुठे? ऑनलाईन पेमेंट चांगला पर्याय असला तरी...

Online Payment: सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंटचा पर्याय सर्वांना सोयीचा वाटतो हे खरे आहे, पण बिले भरताना मध्यस्थ पोर्टल्सचा पर्याय टाळून शक्य तिथे संबंधित पार्टीला थेट तिच्या वेबसाईटवरून पेमेंट करणे  उपयुक्त असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 05:38 AM2022-04-05T05:38:23+5:302022-04-05T05:40:11+5:30

Online Payment: सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंटचा पर्याय सर्वांना सोयीचा वाटतो हे खरे आहे, पण बिले भरताना मध्यस्थ पोर्टल्सचा पर्याय टाळून शक्य तिथे संबंधित पार्टीला थेट तिच्या वेबसाईटवरून पेमेंट करणे  उपयुक्त असते.

Online Payment: Paid online; But where did the money go? | Online Payment: ऑनलाइन पेमेंट केले; पण पैसे गेले कुठे? ऑनलाईन पेमेंट चांगला पर्याय असला तरी...

Online Payment: ऑनलाइन पेमेंट केले; पण पैसे गेले कुठे? ऑनलाईन पेमेंट चांगला पर्याय असला तरी...

- दिलीप फडके
(ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते  
तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com)
सुमारे पाच महिन्यांपूर्वी आम्ही आमचे टाटा प्लेच्या कनेक्शनचे नूतनीकरण  करण्यासाठी BBPS यांना ऑनलाईन पद्धतीने आमच्या बँकेमार्फत पैसे पाठविले. BBPS ने आजपर्यंत ही रक्कम Tata Sky (आता Tata Play)कडे पाठविलेली नाही. BBPS ने ती रक्कम आमच्या बँक अकाउंटवर सुद्धा जमा केलेली नाही. यासंबंधी आम्ही बरेच फोन, मेल्स BBPS ला पाठविले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आमचे पैसे परत मिळविण्यासाठी आता आम्ही काय करावे?
- एक वाचक
सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंटचा पर्याय सर्वांना सोयीचा वाटतो हे खरे आहे, पण बिले भरताना मध्यस्थ पोर्टल्सचा पर्याय टाळून शक्य तिथे संबंधित पार्टीला थेट तिच्या वेबसाईटवरून पेमेंट करणे  उपयुक्त असते.
तुम्ही BBPS म्हणजेच भारत बिल पेमेंट सिस्टीमचा वापर करून पेमेंट केलेले आहे. आपण केलेले पेमेंट टाटा प्ले यांच्याकडे जमा झालेले नाही. तुम्हाला तुमच्या ठिकाणच्या निकटच्या BBPS च्या प्रतिनिधीला भेटून आपली तक्रार दाखल करता येते. BBPS च्या पोर्टलवर आपल्या परिसरातल्या प्रतिनिधींबद्दलची माहिती आपल्याला उपलब्ध आहे. त्या प्रतिनिधीकडे आपली तक्रार दाखल करता येते. पाच दिवसांमध्ये आपल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांचे निराकरण केले जाते, असा BBPS यांचा दावा आहे. BBPS ही रिझर्व बँकेच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत काम करणारी एक व्यवस्था आहे. म्हणजेच त्यावर रिझर्व बँकेचे नियंत्रण आहे. तुम्ही पैसे तुमच्या  बँकेमार्फत पाठविले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेकडे पाठपुरावा करायला हवा. BBPS कडे ई-मेल पाठवून किंवा फोनवर तक्रार करून किंवा बँकेकडे तक्रार करून उपयोग झाला नसेल तर आपण रिझर्व बँकेने निर्माण केलेल्या बँकांच्या लोकपालाकडे (banking ombudsman ) तक्रार करू शकता. या सगळ्या प्रकारात टाटा प्ले यांच्याकडून देखील पाठपुरावा केला गेला तर  ते देखील उपयुक्त ठरू शकेल. पुण्यातल्या ग्राहक पंचायत कार्यालयाचा पत्ता मी मागच्या आठवड्यातल्या लेखात दिला होता. तिथे आपल्याला जाणकार कार्यकर्त्यांकडून मार्गदर्शन मिळू शकेल.

Web Title: Online Payment: Paid online; But where did the money go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा