नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बचत खाते (Saving Account) उघडणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी कागदपत्रांची आवश्यक नाही आणि बँकेच्या शाखेत जायची सुद्धा गरज नाही. खाते उघडण्याचे काम घरातून फक्त 4 मिनिटांत करता येते.
एसबीआयने इंस्टा सेव्हिंग बँक खात्याची (Insta Saving Bank Account) सुविधा सुरू केली आहे. हे आधारवर आधारित इन्स्टंट डिजिटल बचत खाते आहे. ज्याद्वारे ग्राहक बँकेच्या एकत्रित बँकिंग आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म योनोद्वारे (YONO) खाते उघडू शकतात. (online sbi open your sbi insta savings account from the comfort of your home in few minutes know process)
'या' विशेष सुविधा मिळणार
SBI इंस्टा सेव्हिंग्ज बँक खातेधारकांना 24 × 7 बँकिंग प्रवेश मिळतो. एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खात्यातील सर्व नवीन खातेदारांना मूलभूत वैयक्तिक RuPay ATM-cum डेबिट कार्ड मिळेल.
खात्यात किमान रक्कम शिल्लक नसेल तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही…
जर खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक नसेल तर बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही. एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खातेधारकासह दिवसा 24 तास बँकिंग सुविधा उपलब्ध असेल.
(अवघ्या 10 हजारात घरात बसून सुरू 'हा' फायदेशीर व्यवसाय; दरमहा होईल लाखो रुपयांची कमाई! )
असे उघडा खाते…
– एसबीआय इंस्टा सेव्हिंग्ज बँक खाते उघडण्यासाठी ग्राहकांना योनो (YONO) अॅप डाउनलोड करावा लागेल.
– यानंतर, तुम्हाला पॅन आणि आधारची माहिती भरा आणि ओटीपी सबमिट करा आणि इतर तपशील भरा.
– एसबीआय इंस्टा सेव्हिंग्ज बँक खातेदारांसाठी नोमिनेशन सुविधा देखील उपलब्ध आहे.
– नोमिनेशन एसएमएस अलर्ट आणि SBI क्विक मिस्ड कॉल सर्व्हिसद्वारे केले जाऊ शकते.
– प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, खातेधारकाचे खाते त्वरित सक्रिय होईल आणि तो व्यवहार सुरू करू शकेल.
– ग्राहक पूर्ण केवायसी पूर्ण करण्यासाठी एका वर्षाच्या आत जवळच्या बँक शाखेत भेट देऊ शकतात.
(आरबीआयने देशातील सर्वात मोठ्या बँकेला ठोठावला कोटींचा दंड, जाणून घ्या कारण....)