मुंबई : पुरुषांमध्येही ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढत असून ६५ टक्के पुरुष हे ऑनलाईन शॉपिंग करीत असतात. यापैकी २९ टक्के पुरुष हे केवळ ऑनलाईन शॉपिंगच करीत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी किराणा, कृत्रिम दागिने आणि अंतर्वस्त्रांची खरेदी ही दुकानात जाऊनच केली जात असल्याचेही दिसून आले आहे.‘लोकमत’च्या इनसाईट्स टीमने राज्यातील विविध शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून पुरुष ग्राहकांच्या खरेदीची पद्धत आणि त्यासाठी वापरली जाणारी साधने याबाबत माहिती हाती लागली आहे.सेलच्या नवनवीन आॅफर्स तसेच प्रमोशन याबाबतची माहिती मिळविण्यासाठी पुरुष हे मुख्यत: दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांवर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर मित्रांकडून मिळणारी याबाबतची तोंडी माहितीही पुरुषांच्याबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत असते.बूट, पट्टे आणि शर्ट्स हे मुख्यत: आॅनलाईन खरेदी केले जातात. मात्र इ- शर्ट्सच्या खरेदीवर कमीत कमी खर्च केला जाताना दिसतो. शर्ट्सवर सरासरी १७०० रुपये तर जीन्स, तसेच पॅँट्सवर सरासरी १७१० रुपये खर्च केले जात असल्याचे आढळून आले आहे.