Join us

ऑनलाइन शॉपिंगच्या नावे फसवणुकीचाच धंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 4:48 AM

कंपनीस १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काढलेल्या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला बक्षीस लागले आहे.

अजित गोगटेमुंबई : कंपनीस १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काढलेल्या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला बक्षीस लागले आहे. सरकारी कर व प्रक्रिया शुल्कापोटी थोडी रक्कम भरून तुम्ही ते बक्षीस घेऊ शकता, अशी बतावणी करत ‘नापतोल’ या आॅनलाइन शॉपिंग कंपनीच्या नावे लोकांची फसवणूक करण्याचा धंदा सुरू असल्याचे उघड झाले आहे.प्रस्तुत प्रतिनिधीस स्वानुभवातून लबाडीची बातमी मिळाली. या घोटाळ््याचे सूत्रधार देशाच्या अनेक शहरांमधून काम करत असल्याचे दिसून आले. ‘नापतोल’कडे चौकशी करता आमची कोणतीही बक्षीस योजना नाही. अशा फोनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा, असे त्यांच्या कस्टमर केअर नंबरवरून सांगण्यात आले. वेळीच सावधपणा दाखविल्याने हा प्रतिनिधी गळास लागला नाही.इतरांची फसवणूक टाळण्यासाठी या घोटाळ््याची कार्यपद्धती सोबत दिली आहे. हल्ली अशा प्रकारचे फोन येणे रोजचेच बनले आहे. हे फोन हमखास ठाऊक नसलेल्या नंबरवरून येतात. तसेच हे इतर राज्यांमधील असतात.>कॉल आल्यानंतर काय घडले?११ फेब्रुवारी २०१९ : तुमची लकी ड्रॉमध्ये निवड झाली आहे. घरच्या पत्त्यावर एक लिफाफा पाठवू. त्यातील स्क्रॅचकार्डवर बक्षिसाचा कोड असेल तो आम्हाला कळवा, असा फोन. हा फोन बिहारमधील ९५७६५४५९६८ या मोबाइल नंबरवरून आला.५ मार्च २०१९ : घरी टपालाने लिफाफा आला. त्यावर फक्त बटवडा टपाल कार्यालयाचा शिक्का. पाठविणाऱ्याचे नाव निरंजन कुमार व जेथून पाठविले तो ८३२१०६ पिनकोड झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातील पोस्ट आॅफिसचा.लिफाफ्यात ‘नापतोल’च्या नावे इंग्रजीत पत्र, एक विनिंग सर्टिफिकेट व एक स्क्रॅचकार्ड. आत ‘नापतोल’चा हैदराबादचा पत्ता. हेल्पलाइन नंबर ८५२११४९२६५. प्रत्यक्षात क्रमांक बिहारचा.स्क्रॅचकार्ड स्क्रॅच केले असता आत जीडीसीओ ६ एलई कोड व खाली ‘डस्टर’ मोटारीचे चित्र.हेल्पलाइनवर फोनवर कळवताच, स्क्रॅचकार्ड व विनिंग सर्टिफिकेट व्हॉट््सअ‍ॅप करण्यास सांगितले.ते करताच हेल्पलाइनवरून उलटा फोन. बक्षीस म्हणून ७.४० लाखाची ‘डस्टर’ गाडी. गाडी वा तेवढी रोख यापैकी काहीही घेऊ शकता. गाडीसाठी १ टक्का म्हणजे ७,४०० रुपये आधी व ३ टक्के म्हणजे २२,२०० गाडी ताब्यात घेताना भरा. अथवा ७,४०० रुपये भरून रोख ७.४० लाख घेऊ शकता.रक्कम भरण्यासाठी स्टेटबँक आॅफ इंडियाचा १०१२७१२९४५० हा खाते क्रमांक व एसबीआयआयएन ०००१४०६ आयएफएससी कोड दिला. स्टेट बँकेच्या वेबसाइटवर शोध घेता हे खाते मुंबईतील विक्रोळी शाखेत सुलोचना उदयनाथ साही या नावाने असल्याचे निष्पन्न.रक्कम जमा करण्यासाठी बँक खात्याच्या तपशिलाची मागणी.ती देण्यापूर्वी नापतोलच्या कस्टमरकेअर नंबर ८५२११४९२६५ वर चौकशी करता ही फसवणूक असल्याचे उघड. पैसे जमा न केल्याने फेसवणूक टळली.

टॅग्स :ऑनलाइन