Lokmat Money > बिझनेस न्यूज > आॅनलाइन विवरणपत्रे गतवर्षाच्या भरणाऱ्यांच्या संख्येत तुलनेत थेट ६८ टक्क्यांची वाढ

आॅनलाइन विवरणपत्रे गतवर्षाच्या भरणाऱ्यांच्या संख्येत तुलनेत थेट ६८ टक्क्यांची वाढ

यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल व मेमध्ये आयकराची आॅनलाइन विवरणपत्रे भरणाऱ्यांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत थेट ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

By admin | Published: May 19, 2016 04:53 AM2016-05-19T04:53:49+5:302016-05-19T04:53:49+5:30

यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल व मेमध्ये आयकराची आॅनलाइन विवरणपत्रे भरणाऱ्यांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत थेट ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

The online statement is 68 percent faster than the number of last year's enrollment | आॅनलाइन विवरणपत्रे गतवर्षाच्या भरणाऱ्यांच्या संख्येत तुलनेत थेट ६८ टक्क्यांची वाढ

आॅनलाइन विवरणपत्रे गतवर्षाच्या भरणाऱ्यांच्या संख्येत तुलनेत थेट ६८ टक्क्यांची वाढ

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल व मेमध्ये आयकराची आॅनलाइन विवरणपत्रे भरणाऱ्यांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत थेट ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यात देशामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. ही माहिती सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (सीबीडीटी) सूत्रांनी दिली.
>करदात्यांनी आपली आयकर विवरणपत्रे आॅनलाइन भरली. एप्रिल महिन्यात आयकर विवरणपत्रे भरण्यासाठी ४.९४ लाख करदात्यांनी आॅनलाइन सुविधेचा वापर केला होता.
आॅनलाइन आयकर विवरणपत्रे यंदा एप्रिल महिन्यात भरली गेली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात दुपटीने वाढ झाली आहे.
एप्रिल-मे महिन्यात सर्वाधिक विवरणपत्रे दाखल करणाऱ्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र
देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे गुजरात, तामिळनाडू व उत्तर प्रदेशचे करदाते आहेत.
>वाढ होण्याचे कारण...
सीबीडीटीने आॅनलाइन आयकर विवरणपत्रे भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी व सरळ बनवली.
आयकराचे ९ प्रकारचे सारे फॉर्म्स सीबीडीटीने आॅनलाइन यंत्रणेवर कार्यान्वित केले. त्याचा सर्वाधिक लाभ यंदा महाराष्ट्रातले करदाते घेत आहेत.
सीबीडीटीने यंदा ३0 मार्च रोजी इन्कम टॅक्स रिटर्न्सचे नवे फॉर्म्स लागू केले. ते घरी बसून सहज भरता येण्याजोगे आहेत.
ज्या करदात्यांनी आतापर्यंत आॅनलाइन विवरणपत्रे सादर केली, त्यापैकी 49.54%
करदात्यांनी कार्यालयीन वेळेनंतर तर ३५.२७ टक्के करदात्यांनी इन्कम टॅक्स वेबसाइटवरील टॅक्स कॅल्क्युलेटर युटिलिटीचा वापर करीत ती भरली आहेत. सरल फॉर्मचा हा दृश्य परिणाम असल्याचा दावा सीबीडीटीने केला आहे.

Web Title: The online statement is 68 percent faster than the number of last year's enrollment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.