Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुवर्ण रोखे योजनेतून फक्त १५० कोटी

सुवर्ण रोखे योजनेतून फक्त १५० कोटी

सरकारने मोठा प्रचार व प्रसिद्धी केलेल्या सरकारी सुवर्ण रोखे योजनेतून मिळालेल्या आकड्यांवर नजर टाकली, तर ही योजना लोकांना आवडली नसल्याचे दिसते

By admin | Published: November 22, 2015 11:37 PM2015-11-22T23:37:57+5:302015-11-22T23:37:57+5:30

सरकारने मोठा प्रचार व प्रसिद्धी केलेल्या सरकारी सुवर्ण रोखे योजनेतून मिळालेल्या आकड्यांवर नजर टाकली, तर ही योजना लोकांना आवडली नसल्याचे दिसते

Only 150 crores from Gold Raksha Yojana | सुवर्ण रोखे योजनेतून फक्त १५० कोटी

सुवर्ण रोखे योजनेतून फक्त १५० कोटी

मुंबई : सरकारने मोठा प्रचार व प्रसिद्धी केलेल्या सरकारी सुवर्ण रोखे योजनेतून मिळालेल्या आकड्यांवर नजर टाकली, तर ही योजना लोकांना आवडली नसल्याचे दिसते. ही योजना केवळ १५० कोटी रुपयेच जमा करू शकली. या योजनेला अतिशय मंद प्रतिसाद लाभण्यास इतर कारणेही जबाबदार आहेत. त्यात सलग आलेल्या सुट्या आणि सोन्याबद्दल लोकांचा बदललेला दृष्टिकोन.
रिझर्व्ह बँकेने या योजनेतून नेमकी किती रक्कम उभी राहिली हे जाहीर केलेले नाही. मात्र, सरकारी बँकांनी ही रक्कम एकूण १५० कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अपेक्षेपेक्षा कमी पैसा उभा राहण्याचे मुख्य कारण म्हणजे यात एक ग्रॅम सोन्याची किंमत २,६८४ रुपये ठेवण्यात आली. प्रत्यक्षात बाजारात ती किंमत त्यापेक्षा कमी आहे. साहजिकच आहे की, कोणीही या योजनेतील सोने जास्त पैसे मोजून का विकत घेईल? आमच्या बँकेने या योजनेद्वारे ५० कोटी रुपये मिळविण्याचे लक्ष्य ठेवले होते.

Web Title: Only 150 crores from Gold Raksha Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.