ट्विटरनं आपल्या युजर्ससाठी मोनेटायझेशन फिचर्स आणला आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जर तुम्ही तुमच्या ट्विटरवर फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असाल किंवा एखादं ट्विट करत असाल तर त्यातून तुम्हाला कमाईची मोठी संधी आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे जर तुमच्या ट्विटरवर ५०० फोलोअर्स असले तरी तुम्ही अकाऊंट मोनेटायझेशन साठी एप्लाय करून पैसे कमावू शकता. नेमकं ही कमाई कशी होईल, अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
ट्विटर मोनेटायझेशनसाठी फक्त तेच लोक अर्ज करू शकतात, ज्यांनी ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन घेतले आहे. डेस्कटॉपसाठी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन ९०० रुपये आहे. तर मोबाईल ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी दरमहा ६५० रुपये मोजावे लागतील. तुमचे ट्विटरवर ५०० फॉलोअर्स असल्यास तुम्ही कमाईसाठी अर्ज करू शकता. पण अट अशी आहे की, ५०० फॉलोअर्ससोबतच, तुम्हाला गेल्या ३ महिन्यांत ट्विटरवर किमान १५ मिलियन इंप्रेशन मिळाले पाहिजेत. तुम्ही या सर्व अटी पूर्ण केल्यास, आपण Twitter कंटेन्ट मोनेटायझेशन प्रोग्रॉम सामील होऊ शकता. यानंतर तुम्ही $५० (रु. ४०००) कमावू शकाल.
अर्ज कसा करायचा?
ट्विटर मोनेटायझेशन कार्यक्रमासाठी, सर्वप्रथम तुम्हाला ट्विटर अकाउंटच्या सेटिंग्जवर जावे लागेल.
यानंतर अकाउंट ऑप्शनच्या खाली मोनेटायझेशन ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शन आणि अॅड रेव्हेन्यू शेअरिंगचा पर्याय मिळेल.
यानंतर तुम्हाला दोन्ही पर्यायांवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर तुमच्या पोस्ट किंवा व्हिडिओसोबत जाहिरात दिसेल, त्यानुसार तुम्हाला पैसे दिले जातील.