नवी दिल्ली : आयकर विवरण दाखल करण्यासाठी एक दिवसच शिल्लक आहे. बहुसंख्य करदाते सध्या विवरण दाखल करण्याच्या कामात गुंतले आहेत. सरकारही सातत्याने त्याबाबत जनजागृती करत आहे. जास्तीत जास्त लाेकांनी आयकर विवरण दाखल करावे, यासाठी सरकार बरेच प्रयत्न करूनही विवरण दाखल करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या ५ वर्षांमध्ये १.६३% वाढ झाली आहे. त्या तुलनेत वैयक्तिक कर संकलन ७३ टक्क्यांनी वाढले आहे.
वार्षिक उत्पन्न आणि लाेकसंख्येचे प्रमाण २.५ लाखांपेक्षा कमी ५७% २.५ ते ५ लाख १८% ५ ते १० लाख १७% १० ते ५० लाख ०७% ५० लाखांपेक्षा+ ०१%
असा जमा झाला आयकरआर्थिक विवरण कर संकलन वर्ष (काेटी) (लाख काेटी)२०१८-१९ ६.७४ ४.७३२०१९-२० ६.७८ ४.९२२०२०-२१ ६.९७ ४.८७२०२१-२२ ७.१४ ६.९७२०२२-२३ ६.८५ ८.२० (अंदाजित)
या देशांमध्ये नगण्य आयकर : माल्टा, सायप्रस, एंडाेरा, सिंगापूर, माेंटेनेग्राे, ॲटिग्वा, लक्झेमबर्ग, आइसलँड, माॅरिशस, आयर्लंड, बर्म्युडा, माेनॅकाे, स्वित्झर्लंड, बहामास, आयल ऑफ मॅन.
किती लाेक भरतात आयकर?भारत - ६.२%अमेरिका - ५९.९%ब्रिटन - ५६%फ्रान्स - ५८%चीन - ९.८%