Lokmat Money > बिझनेस न्यूज > करात सूट दिली तरच महिंद्रची नाशकात गुंतवणूक पवन गोयंका : मुंबई येथे दिली माहिती

करात सूट दिली तरच महिंद्रची नाशकात गुंतवणूक पवन गोयंका : मुंबई येथे दिली माहिती

मुंबई : नाशिकमध्ये एलबीटी लागू असल्याने सातपूरमधील महिंद्रच्या कारखान्यात अधिक गुंतवणूक करण्याचा कोणताही विचार नसल्याचे या कंपनीचे कार्यकारी संचालक पवन गोयंका यांनी येथे स्पष्ट केले. अर्थात, महापालिकेने करात सूट दिली तरच नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी येथे स्पष्ट केले.

By admin | Published: September 26, 2014 11:15 PM2014-09-26T23:15:36+5:302014-09-27T23:18:52+5:30

मुंबई : नाशिकमध्ये एलबीटी लागू असल्याने सातपूरमधील महिंद्रच्या कारखान्यात अधिक गुंतवणूक करण्याचा कोणताही विचार नसल्याचे या कंपनीचे कार्यकारी संचालक पवन गोयंका यांनी येथे स्पष्ट केले. अर्थात, महापालिकेने करात सूट दिली तरच नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी येथे स्पष्ट केले.

Only after getting the tax breaks, Mahindra invested in Nashik Pawan Goenka: The information given in Mumbai | करात सूट दिली तरच महिंद्रची नाशकात गुंतवणूक पवन गोयंका : मुंबई येथे दिली माहिती

करात सूट दिली तरच महिंद्रची नाशकात गुंतवणूक पवन गोयंका : मुंबई येथे दिली माहिती

मुंबई : नाशिकमध्ये एलबीटी लागू असल्याने सातपूरमधील महिंद्रच्या कारखान्यात अधिक गुंतवणूक करण्याचा कोणताही विचार नसल्याचे या कंपनीचे कार्यकारी संचालक पवन गोयंका यांनी येथे स्पष्ट केले. अर्थात, महापालिकेने करात सूट दिली तरच नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी येथे स्पष्ट केले.
महिंद्र स्कॉर्पिओच्या नूतन आवृत्तीचे सादरीकरण झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. नाशिकमध्ये महिंद्रची अनेक उत्पादने असून, आधी जीप, मग बोलेरो तसेच स्कॉर्पिओ, लोगन, झायलो अशा अनेक मोटारींची श्रेणी नाशिकमध्येच विकसित झाली असून, उत्पादनदेखील करण्यात येत आहे. तथापि, मध्यंतरी महिंद्रच्या संशोधन आणि विकास विभागाचे चेन्नई येथे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर मोटारींसाठी होऊ घातलेली गंुतवणूक नाशिकऐवजी पुणे जिल्‘ात चाकण येथे करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये जकात आणि एलबीटीमुळे उत्पादन खर्चात वाढ होते. त्या तुलनेत चाकण येथे अशा प्रकारचे कर नसल्याने उत्पादन खर्च कमी होतो. साहजिकच ग्राहकांना काहीशा कमी किमतीत स्कॉर्पिओ देता येते, असे सांगून गोयंका म्हणाले की, नाशिकमध्ये सध्या तीन हजार, तर चाकणला एक हजार स्कॉर्पिओंचे उत्पादन होते. नाशिकमध्ये महापालिकेने एलबीटीत सवलत दिली तर येथे गुंतवणूक करण्याचा विचार करता येईल, असे गोयंका यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Only after getting the tax breaks, Mahindra invested in Nashik Pawan Goenka: The information given in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.