Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वीस बँकेमध्ये भारतीयांचे केवळ चार हजार 500 कोटी रुपये

स्वीस बँकेमध्ये भारतीयांचे केवळ चार हजार 500 कोटी रुपये

स्वीस बँकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट दिसून आली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2016 मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2017 11:34 PM2017-06-29T23:34:32+5:302017-06-29T23:34:32+5:30

स्वीस बँकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट दिसून आली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2016 मध्ये

Only four thousand 500 crores of Indians in the Swiss bank | स्वीस बँकेमध्ये भारतीयांचे केवळ चार हजार 500 कोटी रुपये

स्वीस बँकेमध्ये भारतीयांचे केवळ चार हजार 500 कोटी रुपये

>नवी दिल्ली, दि. 29 - स्वीस बँकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट दिसून आली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार  2016 मध्ये स्वीस बँकांमध्ये भारतीयांच्या केवळ 4 हजार 500 कोटी रुपयांच्याच ठेवी उरल्या आहेत. आधीच्या तुलनेत ही रक्कम निम्म्याने घटली आहे. काळ्या पैशाविरोधात मोदी सरकारकडून उचलण्यात येत असलेली कठोर पावले, तसेच स्वीस बँकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे स्वीस बँकेत भारतीयांनी ठेवलेला पैसा घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे स्वीस बँकेमधील भारतीयांच्या ठेवी घटल्या असल्या तरी इतर देशांकडून ठेवण्यात येणाऱ्या रकमेचा आकडा वाढून 96 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.  
स्वीत्झर्लंडची केंद्रीय बँक असलेल्या स्वीस नॅशनल बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार स्वीस बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेली रक्कम 2016 च्या अखेरीस 664.8 दशलक्ष स्वीस फ्रँक एवढी होती. तर जबाबदार संस्थांनी जमा केलेली रक्कम जवळपास 11 दशलक्ष  डॉलर होती. 2016 साली भारतीयानी स्वीस बँकेत जमा केलेल्या रकमेमध्ये 45 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याबरोबरच हा आकडा 675 दशलक्ष फ्रँकवर आला आहे. स्वीस बँकांमध्ये जमा रकमेत झालेली ही सर्वात मोठी वार्षिक घसरण आहे. 
  एवढेचा नाही तर स्वीत्झर्लंडच्या बँकांचा वार्षिक नफा 2016 साली निम्म्याने घटून 7.9 अब्ज स्वीस फ्रँकवर म्हणजेच 53 हजार कोटी रुपयांवर आला आहे. येथील बँकांच्या गोपनियतेवर येत असलेला जागतिक दबाब याला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.  तसेच स्वीत्झर्लंडमधील बँकांची संख्या घटून 266 वरून 261 वर आली आहे. 

Web Title: Only four thousand 500 crores of Indians in the Swiss bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.