Join us

केवळ ५ हजार महिना गुंतवा, १ लाख पेन्शन मिळवा अन् करही वाचवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 9:39 AM

वाढती महागाई लक्षात घेता पुढील २० ते ३० वर्षानंतर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात मासिक उत्पन्नाची गरज असेल.

लोकमत न्यूज नेटवर्क: वाढती महागाई लक्षात घेता पुढील २० ते ३० वर्षानंतर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात मासिक उत्पन्नाची गरज असेल. आज तुमचे वय २५ वर्षे आहे आणि निवृत्तीनंतर १ लाख रुपये मासिक पेन्शन हवी असेल तर एनपीएस हा उत्तम पर्याय आहे, कसे ते जाणून घेऊ...

अनेक पर्याय

संघटीत क्षेत्रासाठी राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम (एनपीएस) तसेच असंघटीत क्षेत्रासाठी अटल पेन्शन योजना सुरू आहे. एनपीएस शेअर बाजार, सरकारी रोखे, कॉर्पोरेट बाँड आणि अन्य मालमत्तांमध्ये गुंतवणूक करते.

एनपीएसमधील पैसे वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढता येतात. विशेष परिस्थितीमध्ये ६० वर्षांच्या अगोदर पैसे काढता येऊ शकतात. याचवेळी निवृत्तीच्या वेळी पूर्ण कॉर्पसची ६० टक्के रक्कम काढता येते, जी कर मुक्त आहे. उर्वरित ४० टक्के रक्कम ॲन्युइटीमध्ये टाकून ज्यावर प्रत्येक महिन्याला पेन्शन दिली जाते. पेन्शनची रक्कम  करपात्र असते.

जर एनपीएससोबत २५ वर्षे वयात असताना जोडले गेले तर ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्याला प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये रक्कम जमा करावी लागेल. एनपीएसमध्ये एकूण गुंतवणुकीवर अंदाजे वार्षिक १० टक्के परतावा मिळाला तर एकूण कॉर्पस १.९१ कोटी रुपये होईल. यातील ६५% रकमेमधून जर ॲन्युइटी खरेदी केली, तर त्याची एकूण किंमत १.२२ कोटी रुपये होईल. ॲन्युइटी दरानुसार ६० वर्ष वय पूर्ण केल्यानंतर प्रत्येक महिन्याला आपल्याला जवळपास १ लाख रुपयांच्या जवळपास पेन्शन मिळेल. ६५% रक्कम ॲन्युइटी खरेदीनंतर निवृत्तीनंतर मिळणारी एकरकमी रक्कम जवळपास ६५ लाख रुपये असेल.

करही असा वाचतो? 

- जे करदाते कर वाचवू इच्छित आहेत, त्यांनी एनपीएसमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. 

- एनपीएसमध्ये ५० हजार रुपयांची अतिरिक्त कर सवलत मिळते. गुंतवणूकदार ७ पेन्शन फंडमधील कोणताही फंड घेऊ शकतात. 

- याचवेळी शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे की डेटमध्ये याचा निर्णय ते घेऊ शकतात.

टॅग्स :निवृत्ती वेतनगुंतवणूक