Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘पुरवठा’ हाच एकमेव निकष

‘पुरवठा’ हाच एकमेव निकष

विक्रीकर मूल्यवर्धित कर (Vat) सेवांवर सेवाकर (service tax) तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील विक्रीवर केंद्रीय विक्रीकर (उरळ) भरले जातात.

By admin | Published: January 17, 2017 05:43 AM2017-01-17T05:43:24+5:302017-01-17T05:43:24+5:30

विक्रीकर मूल्यवर्धित कर (Vat) सेवांवर सेवाकर (service tax) तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील विक्रीवर केंद्रीय विक्रीकर (उरळ) भरले जातात.

The only solution is 'supply' | ‘पुरवठा’ हाच एकमेव निकष

‘पुरवठा’ हाच एकमेव निकष

-अ‍ॅड. विद्याधर आपटे
सध्या उत्पादनावर केंद्रीय उत्पादन शुल्क (Central Excise) विक्रीकर मूल्यवर्धित कर (Vat) सेवांवर सेवाकर (service tax) तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील विक्रीवर केंद्रीय विक्रीकर (उरळ) भरले जातात. यातील उत्पादन शुल्क, सेवाकर आणि केंद्रीय विक्रीवर केंद्राकडे जमा होतात आणि मूल्यवर्धित कर ज्या राज्यातून वस्तूंची विक्री होते त्या राज्याला त्यांचे उत्पन्न म्हणून मिळतो.
‘एक देश एक कर’ ही संकल्पना काहीशी कागदोपत्रीच असणार आहे. कारण प्रत्यक्षात मात्र तीन वेगवेगळ्या तऱ्हेचे कर अस्तित्वात असणार आहेत. फरक एवढाच की जरी तीन वेगवेगळे कर असली तरी कर नियोजन करसंकलन आणि कर निर्धारण एकत्रच आणि त्यासाठीची संगणक प्रणालीही एकच असेल.
एकंदरीत वस्तू व सेवांवरील कराला ‘ज्या सेवेच्या अथवा वस्तूच्या मुक्कामावर आधारित ‘उपभोक्ता कर’ (डेस्टिनेशन बेस्ट कन्झम्प्शन टॅक्स) म्हटले जाईल. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्याला जेव्हा वस्तू अथवा सेवेचा पुरवठा आयजीएसटी कर लावून होईल, तेव्हा ‘मुक्कामी राज्याला’ कराचे उत्पन्न मिळेल. बाकी एकत्रित निधीत (कन्सॉलिडेट फंड)जमा होईल. थोडक्यात ‘पुरवठा करणारी राज्य ही ‘पुरवठा घेणाऱ्या’ राज्यांच्या मानाने तोट्यात जातील.
अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलेल्या तरतुदींनुसार वस्तू व सेवांवरील
कर सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षांपासून पुढील पाच वर्षे राज्यांची ही ‘कर तूट’ केंद्राकडून भरून काढली जाणार आहे. म्हणजेच केंद्र ही नुकसानभरपाई देणार आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे या करासाठी ‘वस्तू अथवा / आणि सेवेचा पुरवठा’ हा एकमेव निकष ग्राह्य धरला जाणार आहे. तीन स्वतंत्र कर दिसत असले, तरी अंतिमत: कागदोपत्री करनियोजन, संयोजन, संकलन
आणि निर्धारण यासाठी व्यापारी, कारखानदार, सेवा घालावे लागणार नाहीत. या नवीन संकल्पना वस्तू व सेवांवरील करांच्या दृष्टीने सकारात्मक नक्कीच ठरतात.
याच अनुषंगाने नेहमीपेक्षा
‘हटके’ असे काही शब्द या मसुदा कायदा आराखडा व सतत पडणाऱ्या प्रश्नांच्या यादीत (फ्रिक्वेंटली
आस्क्ड क्वेश्चन्स-एफएक्यू) आढळतात. त्यांच्या नेमक्या वाटणाऱ्या व्याख्यांचे स्वरूप अजूनही विस्तारीत, परंतु सुटसुटीत कसे करता येईल, ते पाहणे आवश्यक आहे. एकूणच सर्वसामान्य ग्राहकांसाठी त्याची उकल जास्तीत जास्त सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून ढोबळपणे सदर व्याख्यांचा उद्या कसाही अर्थ लावला गेला तरी त्यांच्या मुख्य आशयात काही फरक पडू नये.
५ं3ॅ२३@ॅें्र’.ूङ्मे
नवीन करप्रणालीतील
तीन वेगवेगळे कर
केंद्रीय वस्तूव सेवांवरील कर (केंद्रीय जीएसटी-सीजीएसटी)
आंतरराज्य वस्तू व सेवांवरील कर (इंटिग्रेटेड जीएसटी-आयजीएसटी)
राज्य वस्तू व सेवांवरील कर (स्टेट जीएसटी) असे असतील. यातील सीजीएसटी व आयजीएसटी केंद्राकडे तर एसजीएसटी राज्यांकडे जमा होतील.

Web Title: The only solution is 'supply'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.