Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...तरच मिळतील कॅशलेस सुविधा

...तरच मिळतील कॅशलेस सुविधा

Cashless Facilities : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या आरोग्य सेवेतून कॅशलेस सुविधांचा लाभ मिळत असतो. या सर्व कर्मचाऱ्यांना एक एप्रिलपासून आरोग्य सेवा आणि आयुष्मान योजनेच्या खात्याशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. या संदर्भात कुटुंब कल्याण मंत्रालायने सूचना जारी केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:35 AM2024-04-03T06:35:05+5:302024-04-03T08:07:17+5:30

Cashless Facilities : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या आरोग्य सेवेतून कॅशलेस सुविधांचा लाभ मिळत असतो. या सर्व कर्मचाऱ्यांना एक एप्रिलपासून आरोग्य सेवा आणि आयुष्मान योजनेच्या खात्याशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. या संदर्भात कुटुंब कल्याण मंत्रालायने सूचना जारी केल्या आहेत.

...only then cashless facilities will be available | ...तरच मिळतील कॅशलेस सुविधा

...तरच मिळतील कॅशलेस सुविधा

नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या आरोग्य सेवेतून कॅशलेस सुविधांचा लाभ मिळत असतो. या सर्व कर्मचाऱ्यांना एक एप्रिलपासून आरोग्य सेवा आणि आयुष्मान योजनेच्या खात्याशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. या संदर्भात कुटुंब कल्याण मंत्रालायने सूचना जारी केल्या आहेत.
सर्व लाभार्थी कर्मचाऱ्यांची डिजिटल ओळख निश्चित करणे, त्यांची माहिती संकलित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना महिनाभराची मुदत देण्यात येणार आहे. १९५४ साली सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचे देशभरात ४१ लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनधारकांचाही यात समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: ...only then cashless facilities will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा