Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...तरच हाेणार घरगुती गॅसच्या किमतीत कपात, दुपटीने वाढले वापरकर्ते

...तरच हाेणार घरगुती गॅसच्या किमतीत कपात, दुपटीने वाढले वापरकर्ते

लाेकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला हाेता. त्यावर पुरी यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक घटकांचा किमतींवर परिणाम हाेताे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:12 AM2023-02-10T11:12:38+5:302023-02-10T11:14:03+5:30

लाेकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला हाेता. त्यावर पुरी यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक घटकांचा किमतींवर परिणाम हाेताे.

Only then will there be a reduction in domestic gas prices double the number of users | ...तरच हाेणार घरगुती गॅसच्या किमतीत कपात, दुपटीने वाढले वापरकर्ते

...तरच हाेणार घरगुती गॅसच्या किमतीत कपात, दुपटीने वाढले वापरकर्ते

नवी दिल्ली : सर्वसामान्य जनतेला वाढलेल्या इंधन दरांनी छळले आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी एक हजार रुपये माेजावे लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या किमती ७५0 डाॅलर प्रति मेट्रिक टनाच्या खाली उतरल्यास घरगुती गॅसची किंमत कमी करता येईल, असे पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केले आहे.

लाेकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला हाेता. त्यावर पुरी यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक घटकांचा किमतींवर परिणाम हाेताे. सध्याची परिस्थिती पाहता दाेन किंवा तीन वर्षे दरवाढीचा सामना करावा लागू शकताे. तरीही सरकारने घरगुती गॅसच्या किमती वाढू दिल्या नाहीत, असे पुरी म्हणाले. २०१४ मध्ये १४ कोटी असणारी ही संख्या आता ३१ कोटींवर पोहोचल्याचेही पुरी म्हणाले.
 

Web Title: Only then will there be a reduction in domestic gas prices double the number of users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.