Join us

कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा ओपेक देशांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:41 AM

जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी ३८ टक्के तेल पुरवठा ओपेक देशांतून होतो. कोरोना विषाणूच्या साथीमुळे तेलाच्या किमती घसरल्याने हा निर्णय ओपेकने घेतला आहे.

नवी दिल्ली : तेल उत्पादक व निर्यातदार असलेल्या १४ देशांची संघटना ओपेकने कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज १.५ दशलक्ष बॅरलची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी ३८ टक्के तेल पुरवठा ओपेक देशांतून होतो. कोरोना विषाणूच्या साथीमुळे तेलाच्या किमती घसरल्याने हा निर्णय ओपेकने घेतला आहे.ओपेक देशांनी तेल उत्पादन कपातीची व्यापक योजना आखली आहे. त्यानुसार, दररोज १.५ दशलक्ष बॅरलची उत्पादन कपात लगेच लागू केली जाणार आहे. २०२० च्या अखेरपर्यंत कपात दररोज २.१ दशलक्ष बॅरलवर नेण्यात येणार आहे. २००८ च्या वित्तीय संकटानंतरची ही सर्वांत मोठी तेल उत्पादन कपात ठरणार आहे. तेल उत्पादनातील एकूण कपात दररोज ३.६ दशलक्ष बॅरलवर जाणार आहे. कोरोनामुळे २०२० मध्ये तेल बाजार अस्थिर राहणार असे दिसत आहे. कारण, जगभरात कारखाने बंद झाले आहेत. विमान उड्डाणे रद्दे झाली आहेत.>रशियाचा खोडाया निर्णयानंतर जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या दरात गुरुवारी लगेच ०.६ टक्क्यांची वाढ झाली. या उत्पादन कपातीस रशियाने खोडा घातल्याने कच्च्या तेलाचे दर ५.0 टक्क्यांनी घसरले. ओपेक देशांच्या निर्णयाचा जागतिक तेल पुरवठ्यावर किती परिणाम होतो, हे बिगर ओपेक देशाच्या भूमिकेवर अवलंबून असेल. रशियाची भूमिका महत्त्वाची आहे.