Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त 200 रुपयांत उघडा पोस्टात खातं, बँकेपेक्षा जलद होतील पैसे दुप्पट

फक्त 200 रुपयांत उघडा पोस्टात खातं, बँकेपेक्षा जलद होतील पैसे दुप्पट

पोस्ट ऑफिसला आजही लोक जुन्या काळातील योजनेच्या स्वरूपात पाहतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 04:07 PM2018-08-29T16:07:14+5:302018-08-29T16:08:05+5:30

पोस्ट ऑफिसला आजही लोक जुन्या काळातील योजनेच्या स्वरूपात पाहतात.

In the open post, only 200 rupees, accounts will be faster than the bank, the money doubles | फक्त 200 रुपयांत उघडा पोस्टात खातं, बँकेपेक्षा जलद होतील पैसे दुप्पट

फक्त 200 रुपयांत उघडा पोस्टात खातं, बँकेपेक्षा जलद होतील पैसे दुप्पट

नवी दिल्ली- पोस्ट ऑफिसला आजही लोक जुन्या काळातील योजनेच्या स्वरूपात पाहतात. त्यामुळे जास्त करून ग्राहक हे पैसे बँकेत ठेवण्यास प्राधान्य देतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही अशा प्रकारची गुंतवणूक पोस्टातही करू शकता. विशेष म्हणजे पोस्टात जमा केलेले पैसे बँकेपेक्षा दुप्पट नफा मिळवून देतात. तसेच तुमच्या पैशाचीही पोस्ट ऑफिस हमी देतो. तसेच तुम्ही पोस्टात ठेवी ठेवल्यास तुम्हाला बँकेच्या तुलनेत जास्त व्याज मिळतं. तुम्ही एफडीच्या स्वरूपात पैसे ठेवल्यास तुम्हाला विमा सुरक्षा आणि हमी तर मिळते. त्याशिवाय चांगला परतावाही मिळतो. जर बँकेला काही तोटा झाल्यास योजनेंतर्गत पैसे जमा केलेल्या ग्राहकाला फक्त 1 लाख रुपये परत मिळतात. परंतु पोस्टात असं होतं नाही. पोस्ट ऑफिस तुम्हाला तुमच्या सर्व पैशांची हमी देते. 

फक्त 200 रुपयांपासून सुरू करा खातं
बँकेच्या फिक्स्ड डिपॉजिटसारखीच पोस्ट ऑफिसचीही टाइम डिपॉझिट ही स्कीम आहे. ज्यात तुम्ही कमीत कमी 200 रुपयांपासून खातं उघडू शकता. तसेच जास्त रक्कम जमा केल्यास कोणतीही मर्यादा नाहीये. 

पोस्टात पाहिजे तेवढी खाती उघडू शकता
या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार पाहिजे तेवढी खाती उघडू शकतो. तुमच्याकडे जास्त पैसे असल्यास तुम्ही ते वेगवेगळ्या खात्यांमध्ये भविष्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ठेवू शकता. 
1 ते 5 वर्षांच्या योजनेत किती मिळतं व्याज ?
या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला 6.6 टक्के, दोन वर्षाला 6.7 टक्के, तीन वर्षाला 6.9 टक्के, 5 वर्षांसाठी 7.4 टक्क्यांनी व्याज मिळतं.

मुदतीपूर्वीही काढू शकता पैसे ?
पोस्टात ठेवीच्या स्वरूपात गुंतवलेले पैसे तुम्ही ठरावीक मर्यादेच्या आधीही काढू शकता. परंतु त्यासाठी तुम्ही पैसे गुंतवल्यानंतर 6 महिने पूर्ण झालेले असले पाहिजेत. 
- जर तुम्ही 1 वर्ष, 2 वर्षं, 3 वर्षं, आणि 5 वर्षांसाठी पोस्टात खातं उघडलं असेल, परंतु तुम्ही 6 महिन्यांनंतर वर्षाच्या आत पैसे काढल्यात तुम्हाला तुमचे पैशांवर बेसिक व्याजानुसार परतावा दिला जातो. 
तुम्ही ठेवीच्या मर्यादेच्या आधीच पैसे काढल्यास पोस्ट ऑफिस तुम्हाला तुमच्या सर्व पैशांसह ठरावीक व्याजाच्या 2 टक्के कमी व्याजच्या स्वरूपात परतावा देते. 
दररोज 55 रुपये वाचवून काढा 10 लाखांचा विमा, पोस्टाची सुपरहिट योजना
10 रुपये गुंतवा आणि कमवा भरघोस नफा, पोस्टाची जबरदस्त योजना
पोस्टाच्या योजनांचे फायदे
- टाइम डिपॉजिट योजनेवर व्याज 7.4 टक्के आहे. जो बँकेच्या एफडीपेक्षा जास्त आहे. 
- पोस्टात अमुक एक रक्कम ठेवावीच अशी कोणतीही सक्ती नाही, तुम्ही 200 रुपयांपासून पोस्टाचं खातं उघडू शकता.  
- तुम्ही 5 वर्षांच्या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात चांगला नफा मिळतो. तसेच तुम्हाला या रकमेत प्राप्तिकर कायदा 1961च्या सेक्शन 80 सीअंतर्गत सूटही दिली जाते. जेणेकरून तुमच्या पैशांवर कोणताही कर आकारला जाणार नाही. 
- पोस्टाची योजना ही सरकारी असल्यानं कोणतीही जोखीम नसते. 
- तुम्ही पोस्टात खातं उघडून कर्जही मिळवू शकता. 
- तुम्ही ठरावीक काळासाठी ठेवलेल्या ठेवी काढायचा असल्यास तुम्ही ते पैसे तुमच्या बचत खात्यामध्येही वळते करू शकता. 
- तुमच्या ठेवीतून मिळणारं ठरावीक व्याज तुम्ही रिकरिंग डिपॉझिट खात्यातही फिरवू शकता. परंतु त्यासाठी तुमच्या आरडीची मर्यादा 5 वर्षांची असावी लागते.
पोस्टाची नवी योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळणार जबरदस्त नफा
पोस्टाच्या 'या' तीन योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास मिळणार चौपट नफा, जाणून घ्या कसे गुंतवाल पैसे ?

कुठे उघडू शकता खातं?
पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पोस्टात जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या नियमानुसार, तुम्ही एचडीएफसी, एक्सिस आणि आयसीआयसीआय सारख्या खासगी बँकांमध्येही पोस्टाची खाती उघडू शकता.  

Web Title: In the open post, only 200 rupees, accounts will be faster than the bank, the money doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.