नवी दिल्ली : भारत सरकारने केडर आढाव्याला मंजुरी दिली असून, भारतीय उद्यम विकास सेवेच्या (आयईडीएस) निर्मितीला मान्यता दिली आहे. नव्या सेवेचे गठण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्तांच्या कार्यालयांतर्गत करण्यात येत आहे.
सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नव्या केडरची निर्मिती आणि रचनेतील बदलामुळे संगठन मजबूत होईल. त्याच प्रमाणे स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या योजनांची उद्दिष्टपूर्ती करण्यात मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे संगठन क्षमता वाढेल आणि मंत्रालयाला लक्ष्य गाठण्यात मदत होईल. कारण मंत्रालयाकडे प्रतिबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या कुशल अधिकाऱ्यांचे स्वतंत्र केडर उपलब्ध असेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
‘उद्यम विकास सेवे’च्या निर्मितीचा मार्ग मोकळा
भारत सरकारने केडर आढाव्याला मंजुरी दिली असून, भारतीय उद्यम विकास सेवेच्या (आयईडीएस) निर्मितीला मान्यता दिली आहे
By admin | Published: December 22, 2016 12:41 AM2016-12-22T00:41:22+5:302016-12-22T00:41:22+5:30