Lokmat Money > बिझनेस न्यूज > OpenAI चे सीईओ मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार, सत्य नडेलांनी दिली मोठी जबाबदारी

OpenAI चे सीईओ मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार, सत्य नडेलांनी दिली मोठी जबाबदारी

OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्याकडे मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 04:56 PM2023-11-20T16:56:10+5:302023-11-20T16:57:26+5:30

OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्याकडे मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

OpenAI CEO to Join Microsoft, Satya Nadel Gives Big Responsibility | OpenAI चे सीईओ मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार, सत्य नडेलांनी दिली मोठी जबाबदारी

OpenAI चे सीईओ मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार, सत्य नडेलांनी दिली मोठी जबाबदारी

OpenAI Sam Altman : एका वर्षापूर्वी ChatGPT ची निर्मिती करणाऱ्या OpenAI कंपनीने सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना अचानक पदावरुन दूर केले आहे. मायक्रोसॉफ्टशी संलग्न ओपन एआय कंपनीने घेतलेला हा निर्णय अतिशय धक्कादायक असल्याचे अनेकांचे म्हणने आहे. सोशल मीडियावर याबाबत विविध चर्चाही सुरू झाल्या. आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadela) यांनी समोर येऊन याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

नडेला यांनी सोमवारी दुपारी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये सॅम ऑल्टमन, मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले. याशिवाय, नडेलांनी एम्मेट शीअर (Emmett Shiar) हे OpenAI चे नवे बॉस असतील, अशी माहितीही दिली. आता सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन मायक्रोसॉफ्टच्या नवीन प्रगत एआय संशोधन संघाची जबाबदारी स्वीकारतील. लवकरच त्यांना यासाठी योग्य संसाधने उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

सॅम ऑल्टमनला अनेकांचा पाठिंबा
सॅम ऑल्टमनला अचानक OpenAI च्या CEO पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून त्यांच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत, अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओपन एआयचे गुंतवणूकदार सॅम ऑल्टमनला कंपनीत परत आणण्याची मागणी करत आहेत. या गुंतवणूकदारांमध्ये Thrive Global चे नाव देखील समाविष्ट आहे, जे ओपन एआयचे सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत.

अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले 
सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात आघाडी उघडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा देऊ केला. राजीनामा देणाऱ्यांच्या यादीत OpenAI सह-संस्थापक ग्रेग ब्रॉकमन यांचेही नाव आहे.

इलॉन मस्क यांनीही ट्विट केले 
याशिवाय, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनीही या विषयावर आपले मत व्यक्त केले आणि सॅम ऑल्टमन यांना ओपन एआयमधून काढून टाकण्याचे कारण सार्वजनिक करण्याची मागणी केली.

एम्मेट शीअर कोण आहे?
एम्मेट शिअर यापूर्वी ट्विचचे सीईओ आणि सह-संस्थापक होते. ही कंपनी 2014 मध्ये Amazon ने विकत घेतली. येथे त्यांनी बराच काळ घालवला. यानंतर 2014 ते 2019 पर्यंत ते सॅम ऑल्टमनने सुरू केलेल्या स्टार्टअपचा एक भाग होते. या स्टार्टअपमध्ये ते अर्धवेळ सल्लागार होते. आता त्यांच्याकडे ओपन एआयची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: OpenAI CEO to Join Microsoft, Satya Nadel Gives Big Responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.