Join us

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरुवात; अदानींच्या नऊ कंपन्यांचे शेअर्स सुस्साट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:14 AM

कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सेन्सेक्समध्ये ७०० अंकांपेक्षा अधिक वाढ दिसून आली होती.

कामकाजाच्या नव्या आठवड्यात सोमवारी शेअर बाजारातील कामकाज तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या टप्प्यात बीएसई सेन्सेक्स 700 अंकांच्या वाढीसह 71397 च्या पातळीवर काम करत होता तर निफ्टी 220 अंकांच्या वाढीसह 21572 च्या पातळीवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ दिसून आली.शेअर बाजाराच्या सुरुवातीला टेक महिंद्रा आणि भारती एअरटेलचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत होते. तर सिप्ला आणि एलटीआय माइंडट्रीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, कोल इंडिया लिमिटेड आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्येही वाढ झाली. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात बरेच चढ-उतार दिसून आले आहेत. केंद्र सरकार या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करणार आहे, तर अमेरिकेत 31 जानेवारीला फेडरल रिझर्व्हची धोरणात्मक बैठक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानुसार शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळतात.अदांनीच्या शेअर्समध्ये तेजीशेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात, गौतम अदानी यांच्या 10 पैकी 9 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते तर ACC लिमिटेडच्या ​​शेअर्समध्ये किंचित घसरण दिसून आली.सोमवारी, नवीन आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, शेअर बाजार प्री ओपनिंग सेशनमध्ये 267 अंकांच्या वाढीसह 70968 च्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 91 अंकांच्या वाढीसह 21433 च्या पातळीवर कार्यरत होता. निफ्टीवर विक्रीचा दबाव असू शकतो आणि त्याला 21250 चा सपोर्ट घेऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. निफ्टीनं 21250 ची सपोर्ट लेव्हल तोडली तर तो 20900 च्या पातळीपर्यंत खाली जाऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात आलीये.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारअदानी