Join us  

महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजकांना राजस्थानचे द्वार खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2016 1:30 AM

राजस्थानातील कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून, महाराष्ट्रातील उद्योजक आणि शेतकऱ्यांनी राजस्थानात येऊन व्यवसाय करावा. त्यासाठी आमच्या

मुंबई : राजस्थानातील कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून, महाराष्ट्रातील उद्योजक आणि शेतकऱ्यांनी राजस्थानात येऊन व्यवसाय करावा. त्यासाठी आमच्या राज्याचे द्वार खुले आहे, असे आवाहन राजस्थानचे कृषिमंत्री प्रभू लाल सैनी यांनी केले. ९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान जयपूर येथे ग्लोबल राजस्थान अ‍ॅग्रिटेक परिषद (ग्राम-२०१६) होणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईत नुकताच रोड-शो आयोजित झाला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ग्राम-२०१६ परिषदेचे नेदरलँड, इस्रायल, आॅस्ट्रेलिया आणि कॅनडा असे देश भागीदार आहेत. इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात फिक्की यांच्या सहकार्याने राजस्थान सरकारने ही परिषद आयोजित केली आहे. (प्रतिनिधी)कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानजयपूरमध्ये होणाऱ्या ग्राम-२०१६ परिषदेमध्ये सिंचनाशी संबंधीत उपकरणे, सोलार पंप, शेती अवजारे आणि यंत्र, कृषी प्रकिया यंत्र अशाप्रकारचे तंत्रज्ञान प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. ‘ग्राम’च्या माध्यमातून जगभरातील कंपन्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.