Join us

गुंतवणुकीसाठी संधी! रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फायदा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 8:33 AM

२०२३ मध्ये भारत जागतिक गुंतवणूकदारांचे आवडीचे ठिकाण बनू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अमेरिकेतील कठोर पतधोरण आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे जगभरातील गुंतवणूक क्षेत्र हवालदिल झालेले असतानाच २०२३ मध्ये भारत जागतिक गुंतवणूकदारांचे आवडीचे ठिकाण बनू शकतो. मजबूत आर्थिक वृद्धी आणि उत्पादनबंधित प्रोत्साहन योजना (पीएलआय) याचा भारताला लाभ मिळत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाला’त ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, व्यवसाय सुलभता व कुशल श्रमशक्ती वाढविण्यासाठी करण्यात आलेले उपाय, थेट परकीय गुंतवणूक धोरणातील उदारता, व्यापक देशांतर्गत बाजाराचे अस्तित्व आणि मजबूत आर्थिक वृद्धी यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात भारत यशस्वी होत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२२मध्ये देशात ४२.५ अब्ज डॉलर एडीआय भारतात आला. यंदा शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूक मात्र घटली आहे. 

भारतात आलेली गुंतवणूक

२०१६-१७     ४.९४२०१७-१८    ३.७०२०१८-१९    ३.६६२०१९-२०    ४.१५२०२०-२१     ४.९२२०२१-२२    ७.११२०२२-२३    २.८८*

(*२०२२-२३ मधील आकडे एप्रिल ते सप्टेंबर या काळातील. आकडे लाख कोटींत) 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :गुंतवणूकभारत