Join us  

सेल्फीप्रेमींसाठी ओप्पोचा 16 मेगापिक्सेलचा फोन लॉन्च

By admin | Published: January 31, 2017 9:10 PM

स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने A57 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. सेल्फीप्रेमींसाठी या फोनमध्ये तब्बल 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - चिनची स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने  A57 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. सेल्फीप्रेमींसाठी या फोनमध्ये तब्बल 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  3 फेब्रुवारीपासून अॅमेझॉन, स्नॅपडील आणि फ्लिपकार्टवर या फोनची विक्री सुरू हाईल. या फोनची किंमत 14 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे.
 
ड्युअल सीम असलेला हा फोन अॅन्ड्रॉईड मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो.  या फोनमध्ये  720×1280 रिझोल्यूशन असलेली 5.2 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. फोनमध्ये 1.4GHz स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर असून 3 जीबी की रॅम आहे. मेमरी स्टोरेजसाठी 32 जीबी इंटरनल स्टोरेज असून मायक्रोएसडी कार्डद्वारे 128 जीबी पर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.  
 
16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेराशिवाय 13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोनशी मिळतं-जुळतं डिझाईन या फोनचं असून यामध्ये  फिजिकल होम बटनही देण्यात आलं आहे, तसेच 2900mAh ची बॅटरी आहे.  
 
कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये   4G LTE, जीपीआरएस/एज, ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, यूएसबी असे ऑप्शन देण्यात आले आहेत.  नोव्हेंबर 2016 मध्ये हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.