Join us

रिलायन्स संचालक मंडळात अनंत अंबानींच्या नियुक्तीला विरोध; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 5:53 PM

अनंत अंबानी यांना संचालक मंडळात घेण्यावरुन दोन गट पडले आहेत.

Ambani Group: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात अनंत अंबानी (Anand Ambani) यांना घेण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या रिलायन्सच्या एजीएममध्ये आकाश, ईशा आणि अनंत अंबानींचा बोर्डात समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. पण आता दोन सल्लागार कंपन्यांचा अनंत अंबानींच्या नावाला विरोध होत आहे. 

अनंत अंबानींच्या वयामुळे अडचण? मीडिया रिपोर्टनुसार, इंटरनॅशनल प्रॉक्सी सल्लागार फर्म इंस्टीट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेज इंक (ISSI) आणि मुंबईमधील इंस्टीट्यूशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायजरी सर्व्हिसेज (IIAS)ने अनंत अंबानी यांना बोर्डावर घेण्यास विरोध दर्शवला आहे. यासाठी त्यांनी अनंत यांच्या वयाचे कारण दिले आहे. या दोन्ही सल्लागार कंपन्यांनी रिलायन्सच्या शेअर होल्डर्सना, अनंत यांना रिलायन्स इंडस्ट्रीज बोर्डावर नियुक्त करण्याच्या प्रस्तावाविरोधात मतदान करण्याची शिफारस केली आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ISSI ने 12 ऑक्टोबर रोजी एक नोट जारी केली होती, ज्यामध्ये अनंत अंबानींच्या वय आणि अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या नोटमध्ये म्हटले की, अनंत यांचा सुमारे 6 वर्षांचा अनुभव त्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाविरोधात मतदानाची हमी देतो. दरम्यान, या दोन्ही कंपन्यांनी अनंत अंबानींची मोठी भावंडे ईशा आणि आकाश अंबानी, यांच्या नियुक्तीला समर्थन दिले आहे. यापूर्वी, IIAS ने 9 ऑक्टोबर रोजी एका अहवालात म्हटले होते की, अनंत अंबानी यांची वयाच्या 28 व्या वर्षी झालेली नियुक्ती मतदानाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाही.

या प्रॉक्सी फर्म अनंत यांच्या समर्थनार्थ एकीकडे ISSI आणि IIAS अनंत अंबानींच्या नियुक्तीच्या विरोधात आहेत, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय प्रॉक्सी फर्म ग्लास लुईस अनंतला पाठिंबा देत आहे. या फर्मचे संचालक डेकी विंडार्टो यांनी म्हटले की, केवळ अनुभवाच्या आधारे ते अनंत अंबानींना वगळू शकत नाहीत. 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत अनंत अंबानी यांची बोर्डावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर शेअरधारकांना मतदान करायचे आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीव्यवसायरिलायन्स