Lokmat Money > बिझनेस न्यूज > तंबाखू क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस नीति आयोगाचा विरोध

तंबाखू क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस नीति आयोगाचा विरोध

तंबाखू क्षेत्रात थेड परकीय गुंतवणुकीस पूर्ण प्रतिबंध घालण्याच्या प्रस्तावास नीति आयोगाने विरोध केला आहे.

By admin | Published: June 10, 2016 04:20 AM2016-06-10T04:20:48+5:302016-06-10T04:20:48+5:30

तंबाखू क्षेत्रात थेड परकीय गुंतवणुकीस पूर्ण प्रतिबंध घालण्याच्या प्रस्तावास नीति आयोगाने विरोध केला आहे.

Opposition in the Tobacco Policy to the Policy Commission | तंबाखू क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस नीति आयोगाचा विरोध

तंबाखू क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस नीति आयोगाचा विरोध


नवी दिल्ली : तंबाखू क्षेत्रात थेड परकीय गुंतवणुकीस पूर्ण प्रतिबंध घालण्याच्या प्रस्तावास नीति आयोगाने विरोध केला आहे.
सध्या तंबाखू क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या तंत्रज्ञान सहयोग, फ्रँचाइजी परवाना, ट्रेड मार्क, ब्रँड नेम आणि व्यवस्थापन करार यात एफडीआयला अनुमती आहे. सिगार, तंबाखूचे, तसेच पर्यायी सिगारेट उत्पादन या क्षेत्रात एफडीआयला बंदी आहे. डीआयपीपीने आता सर्वच प्रकारच्या एफडीआयवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास फ्रंचाइजीचे परवाने, ट्रेड मार्क, ब्रँड नेम आणि प्रबंधन करार यातील एफडीआयवरही बंदी येईल. याचाच अर्थ, तंबाखू क्षेत्रात कोणत्याही प्रकारे एफडीआय येणार नाही. (लोकमत न्युज नेटवर्क)

Web Title: Opposition in the Tobacco Policy to the Policy Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.