प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. जपानमधील एका कंपनीच्या मालकानेही हे सिद्ध करून दाखवलं आहे. शुन्जी सुगाया यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. एके काळी त्यांनी सॉफ्टबँकेची ऑफर नाकारली होती आणि आज अब्जाधीशाकडे वाटचाल सुरू आहे. शुन्जी सुगाया हे अब्जाधीशांच्या यादीत जाण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहेत. वयाच्या 23 व्या वर्षी एक क्षण असा आला ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं.
सुगाया यांनी मार्च 2000 मध्ये एक व्यावसायिक स्पर्धा जिंकली होती. ज्याचे परीक्षक हे सॉफ्टबँक कॉर्पोरेशनचे संस्थापक मासायोशी सन होते. स्पर्धा जिंकल्यानंतर सुगाया यांनी मासायोशी यांना धन्यवाद असा एक मेल पाठवला होता. त्यांची भेटही झाली. याच दरम्यान शुन्जी सुगाया यांना सॉफ्टबँकेने ऑफर दिली. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली. ऑफर मिळाल्याने आनंद झाला पण स्वत: वर विश्वास होता त्यामुळे आपल्या काही कल्पनांवर काम करण्याचा विचार केल्याची माहिती सुगाया यांनी दिली.
सुगाया यांनी ऑप्टिम कॉर्पोरेशन (Optim Corp.) नावाची स्वत: ची कंपनी सुरू केली. जी आता आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि इंटरनेट ऑफ थिग्ज टेक्नॉलॉजीद्वारे व्यवसाय व्यवस्थापन प्लॅटफॉर्म प्रदान करते. सुगाया यांनी घेतलेला निर्णय फायदेशीर ठरला आणि आता सुगायाचे नाव जपानच्या करोडपतींच्या यादीमध्ये आहे. कोरोना व्हायरसच्या या काळात घरातून काम करत असल्याने शुन्जी सुगाया यांच्या कंपनीला मोठा फायदा झाला आहे. कंपनीचे शेअर वाढले आहेत.
कोरोनामुळे अनेक व्यवसाय ऑनलाईन झाले आहेत. गेल्या 3 महिन्यांत डिजिटल काम वेगाने होत आहे तसेच वाढल्याची माहिती सुगाया यांनी दिली आहे. 2000 मध्ये ऑप्टिम कंपनी सुरू केली. सुरुवातीला, फक्त इंटरनेट व्हिडिओ जाहिरात सेवा सुरू केली गेली. नंतर आर्टिफिशीयल इंटेलिजेन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये समावेश करण्यात आला. टेलिकम्युनिकेशमधील दिग्गज कंपन्यासोबत काम केलं आणि यश संपादन केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'मला मृत्यूचा अनुभव घ्यायचाय'; TikTok व्हिडीओ सुरू करून 'तो' विष प्यायला अन् झालं असं काही...
बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा
CoronaVirus News : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'हा' फॉर्म्युला लागू होणार?
इलेक्ट्रिक टूथब्रश आला! एका चार्जिंगमध्ये महिनाभर दात घासणार
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ