Lokmat Money > बिझनेस न्यूज > Orchid Pharma Stock: केवळ ४ महिन्यांमध्ये 'या' शेअरनं केलं मालामाल, १ लाखांचे झाले ६९ लाख

Orchid Pharma Stock: केवळ ४ महिन्यांमध्ये 'या' शेअरनं केलं मालामाल, १ लाखांचे झाले ६९ लाख

Orchid pharma stock Share gave 65 times return in just 4 months after relisting in market many times gain than bitcoin gold or other investment options : चार महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्सची किंमत होती १८ रूपये, परंतु आता कंपनीच्या शेअर्सनं केला १२०० रूपयांचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:07 PM2021-03-09T14:07:48+5:302021-03-09T14:11:16+5:30

Orchid pharma stock Share gave 65 times return in just 4 months after relisting in market many times gain than bitcoin gold or other investment options : चार महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्सची किंमत होती १८ रूपये, परंतु आता कंपनीच्या शेअर्सनं केला १२०० रूपयांचा टप्पा पार

orchid pharma stock gave 65 times return in just 4 months after relisting in market many times gain than bitcoin gold or other investment options | Orchid Pharma Stock: केवळ ४ महिन्यांमध्ये 'या' शेअरनं केलं मालामाल, १ लाखांचे झाले ६९ लाख

Orchid Pharma Stock: केवळ ४ महिन्यांमध्ये 'या' शेअरनं केलं मालामाल, १ लाखांचे झाले ६९ लाख

Highlightsचार महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्सची किंमत होती १८ रूपयेआता कंपनीच्या शेअर्सनं केला १२०० रूपयांचा टप्पा पार

सध्या एक अशी फार्मा कंपनी आहे ज्याच्या शेअर्सची तुलना बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या रूची सोया या कंपनीशी केली जात आहे. या कंपनीचं नाव ऑर्चिड फार्मा (Orchid Pharma Ltd) असं आहे. या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑर्चिड फार्मा या कंपनीच्या शेअर्सनं नोव्हेंबर २०२० पासून आजपर्यंत म्हणजेच चार महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूदारांना ६९०० टक्के रिटर्न दिले आहेत. जर रिटर्न बद्दल सांगायचं झालं तर ज्या लोकांनी ४ महिन्यांपूर्वी या शेअर्समध्ये १ लाख रूपये गुंतवले त्यांचे आज १ लाखांचे ६९ लाख रूपये झाले आहेत. काही विश्लेषक या शेअर्सची तुलना रूची सोया या कंपनीच्या शेअर्सशी करत आहेत. 

Orchid Pharma मध्ये Dhanuka Labs चा ९८.०४ टक्के हिस्सा आहे. याशिवाय आर्थिक संस्थांचाही १.१९ टक्के हिस्सा आहे. परंतु किरकोळ गुंतवणूकदारांसाठी यामध्ये केवळ ०.५ टक्के शेअर्स आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये असलेल्या याच शॉर्टेजमध्ये शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. यापूर्वी पतंजलीची कंपनी रूची सोया आणि दिवाळखोरीत गेलेली कंपनी अलोक इंडस्ट्रीजसोबतही असंच झालं होतं. रूची सोया ज्यावेळी शेअर बाजारात लिस्ट झाली तेव्हा कंपनीच्या शेअर्सची किंमत २१.५५ रूपये इतकी होती. परंतु २६ जून रोजी ते शेअर्स १,५१९.५५ रूपयांवर पोहोचले. 

कंपनी गेली होती दिवाळखोरीत 

दिवाळखोरीत गेल्यानंतर ऑर्चिड फार्मा ही कंपनी एनसीएलटीच्या नुसार धानुका लॅबनं खरेदी केली. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२० रोजी ही कंपनी पुन्हा शेअर बाजारात लिस्ट करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली नाही. ऑर्चिड फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारीही अपर सर्किट लागल्याचं पाहायला मिळालं. ही कंपनी शेअर बाजारात पुन्हा लिस्ट झाल्यानंतर अनेकदा या कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किटच लागलं होतं. 

SBI Gold Loan: एक मिस्ड कॉल देऊन सुरू होणार प्रोसेस, मिळणार ५० लाखांपर्यंत कर्ज

३ नोव्हेंबर २०२० रोजी जेव्हा कंपनी पुन्हा शेअर बाजारात लिस्ट करण्यात आली त्यावेळी कंपनीच्या शेअर्सची किंमत १८ रूपये होती. परंतु आता या शेअर्सची किंमत १,२४५ रूपयांवर पोहोचली आहे. मार्च २०२० मध्ये कंपनीचा महसूल ५०५.४५ कोटी रूपये इतका होता. तर कंपनीचा निव्वळ तोटा १४९.८४ कोटी रूपये इतका होता. या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल १०२.६३ कोटी तर कंपनीला ४५.३३ कोटी रूपयांचा तोटा झाला होता. यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी कायमच आहे. 

Web Title: orchid pharma stock gave 65 times return in just 4 months after relisting in market many times gain than bitcoin gold or other investment options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.