नवी दिल्ली : घातक ई-कचरा साठवून ठेवणाऱ्या वीज वितरण कंपन्यांची तपासणी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने दिल्ली प्रदुषण नियंत्रण समिती आणि केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डाला दिले आहेत. संयुक्तरित्या तपासणी करून स्थितीदर्शक अहवाल सादर करा, असे लवादाने दोन्ही संस्थांना सांगितले. दिल्लीतील आप सरकार आणि वीज वितरण कंपन्यांना लवादाने नोटीसा बजावल्या आहेत. बीएसईएस यमुना पॉवर लिमिटेड, बीएसईएस राजधानी पॉवर लिमिटेड, टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्यूशन लिमिटेड, डीपीसीसी यांचा त्यात समावेश आहे. ३0 मार्चपूर्वी आपले म्हणणे सादर करा, असे लवादाने त्यांना बजावले आहे. प्रतिवादींची
उत्त्तरे येईपर्यंत प्रदुषण नियंत्रण संस्था संयुक्तरित्या तपासणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश लवादाचे प्रमुख न्या. स्वतंतर कुमार यांनी दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
घातक ई-कचरा साठविणाऱ्या वीज कंपन्यांच्या तपासणीचे आदेश
घातक ई-कचरा साठवून ठेवणाऱ्या वीज वितरण कंपन्यांची तपासणी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने दिल्ली प्रदुषण नियंत्रण समिती आणि केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डाला दिले आहेत
By admin | Published: February 25, 2017 12:45 AM2017-02-25T00:45:43+5:302017-02-25T00:45:43+5:30