फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीनं (Swiggy) प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे. कंपनी आता यासाठी ३ रुपये आकारणार आहे. यापूर्वी ती फी २ रुपये होती. त्याचबरोबर स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटो सध्या प्लॅटफॉर्म फी म्हणून २ रुपये आकारत आहे. मात्र, काही ठिकाणी ही कंपनी ३ रुपयेदेखील आकारत आहे. स्विगीनं वाढवलेलं शुल्क ४ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहे.
स्विगीनं सर्वप्रथम बंगळुरू आणि हैदराबागमध्ये आपली प्लॅटफॉर्म फी वाढवली होती. आता ही संपूर्ण देशात लागू करण्यात आली. स्विगीची सध्या प्लॅटफॉर्म फी ५ रुपये आहे. परंतु २ रुपयांची सूट दिल्यानंतर ती ३ रुपये होते. सध्या त्यावर मिळणारी सूट ही या गोष्टीचे संकेत आहेत की येणाऱ्या काळात प्लॅटफॉर्म चार्जमध्ये वाढ करू शकते. प्लॅटफॉर्म चार्ज डिलिव्हरी चार्जच्या व्यतिरिक्त लावला जातो. परंतु स्विगी वनच्या ग्राहकांकडून डिलिव्हरी शुल्क आकारलं जात नाही. परंतु प्लॅटफॉर्म फी स्विगी वनच्या ग्राहकांनाही द्यावी लागते.
काय म्हटलंय कंपनीनं?
ईटीशी बोलताना स्विगीच्या प्रवक्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्लॅटफॉर्म फी बाबात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या बहुतांश शहरांमध्ये ३ रुपये प्लॅटफॉर्म चार्ज म्हणून घेतले जातात. हे या इंडस्ट्रीच्या तुलनेत सामान्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
Swiggy मधून जेवण मागवणं झालं महाग! पूर्वीच्या तुलनेत ५० टक्के अधिक लागणार 'हे' शुल्क
स्विगीनं वाढवलेलं शुल्क ४ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 02:07 PM2023-10-16T14:07:22+5:302023-10-16T14:07:39+5:30