Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिल्?ात 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत मोहिमेचे आयोजन

जिल्?ात 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत मोहिमेचे आयोजन

जिल्?ात निर्मल भारत अभियानांतर्गत 2 ऑक्टोबर रोजी 219 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी स्वच्छतेची शपथ दिली जाणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे यांनी दिली़

By admin | Published: September 29, 2014 11:19 PM2014-09-29T23:19:39+5:302014-09-29T23:19:39+5:30

जिल्?ात निर्मल भारत अभियानांतर्गत 2 ऑक्टोबर रोजी 219 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी स्वच्छतेची शपथ दिली जाणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे यांनी दिली़

Organizing a Clean India campaign on October 2 in District | जिल्?ात 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत मोहिमेचे आयोजन

जिल्?ात 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत मोहिमेचे आयोजन

ल्?ात निर्मल भारत अभियानांतर्गत 2 ऑक्टोबर रोजी 219 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी स्वच्छतेची शपथ दिली जाणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे यांनी दिली़
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 10़30 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची शपथ मुख्यालयात असणारे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांना दिली जाणार आह़े यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेची शपथ घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत़ केंद्र आणि राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांना 2 ऑक्टोबर रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत़ या स्वच्छतेच्या शपथेमध्ये एका वर्षात 100 तास र्शमदान करण्याबाबत आवाहन करण्यात आलेले आह़े दर आठवड्याला दोन तास शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थ्यांनादेखील आवाहन करण्यात आले आह़े स्वच्छतेची सुरुवात स्वत:च्या घरापासून, गल्लीपासून, गावापासून व कार्य करीत असलेल्या ठिकाणापासून करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आह़े प्रत्येक व्यक्ती या उपक्रमात सहभागी होत असताना अन्य 100 व्यक्तींना स्वच्छतेसाठी सहभागी करुन घेऊन स्वच्छ भारत मोहिमेचा प्रचार करण्याचे आवाहन अहिरे यांनी केले आह़े
चौकट़़़
जिल्हा परिषदेला पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबरपासून स्वच्छ भारत मिशन सुरू केले असून, त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, प्रत्येक ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत होऊ शकते त्यासाठी या स्वच्छता अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन करणारे निवेदन नितीन गडकरी यांनी पाठविले आह़े

Web Title: Organizing a Clean India campaign on October 2 in District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.