नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमधील ओरिएंटल इंडिया ग्रुपकडे सापडलेल्या काळया पैशाची रक्कम तब्बल ३ हजार कोटी रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेच (सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्स) कंपनीचे नाव न देता ही माहिती दिली आहे. सीबीडीटीने दिल्ली-एनसीआर भागातील एक कंपनी एवढाच उल्लेख केला आहे.गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओरिएंटल इंडिया ग्रुपच्या २५ ठिकाणच्या कार्यालये व अन्य स्थानांवर छापे घातले होते. त्यातच हा काळा पैसा सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.पायाभूत सुविधा, बांधकाम व खाणकाम या क्षेत्रांतील ही मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. छाप्यामध्ये अधिकाऱ्यांना २५0कोटी रुपयांच्या बेहिशेबी रकमेचा ताळमेळ लागू शकला नसून, तोकाळा पैसा असल्याचे सांगण्यात आले.मालमत्ता केली जप्तया कंपनीने ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम काळ्या पैशाच्या रूपात असल्याचे व त्यावरील व्याज भरण्याचे मान्य केल्याचे वृत्त आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाºयांनी पावणेचार कोटी रुपये किमतीची कंपनीची मालमत्ताही हस्तगत केली असून, कंपनीचे विविध बँकांतील ३२ लॉकर्सही सील केले आहेत.
दिल्लीतील ओरिएंटल ग्रुपकडे ३ हजार कोटींचे काळे धन?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 12:22 AM