कॅलिफोर्निया : खर्च कमी करण्याचे कारण पुढे देत गुगलने जानेवारीत जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. असे असतानाच नोकरी सोडून इतर ठिकाणी जाऊ नये म्हणून एका कर्मचाऱ्याला तब्बल ३०० टक्के पगारवाढीची ऑफर दिली आहे. हा कर्मचारी गुगल सोडून ‘पर्पेप्लेक्सिटी एआय’ या कंपनीत जाण्याच्या विचारात होता. कंपनीने त्याला देऊ केलेल्या वाढीव पगारावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
कर्माचरी कपात करीत असताना कोणतीही कंपनी साधारणपणे जादा वेतन असलेल्यांना आधी काढून टाकते. पगाराच्या तुलनेत काम दिसत नसल्याचे कारण पुढे केले जाते. अशीच पद्धती गुगलने या काळात अवलंबिलेली दिसते. (वृत्तसंस्था)
१२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
गुगलने हार्डवेअर, सेंट्रल इंजिनिअरिंग आणि गुगल असिस्टंट या विभागात काम करणाऱ्यांची संख्या आणखी कमी केली आहे. मागच्या वर्षी कंपनीने १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.
कंपनीत कामावर विपरित परिणाम होऊ न देता कर्मचाऱ्यांना दीर्घ रजेवर जाता येते. परंतु आता सर्वांच्या कामावर बारकाईने देखरेख ठेवली जाऊ लागली आहे.