मुंबई- गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. परंतु आता सरकारनं नवा नियम काढला आहे, त्यामुळे तुमचं गॅस कनेक्शनही रद्द होऊ शकतं. मीडिया रिपोर्टनुसार, ज्यानं आपलं केवायसी अपडेट केलेलं नाही, त्यांचं गॅस कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे. यात जास्त करून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकांचा समावेश आहे.भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन गॅस या कंपन्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना केवायसी पूर्ण करण्यास सांगितलं आहे. अद्यापही अनेक ग्राहकांनी केवायसी पूर्ण केलेलं नाही, त्यांचं कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र असलेल्या ग्राहकांना लागलीच गॅस कनेक्शन मिळणार आहे.आयओसी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला केवायसीसाठी आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, लीज अॅग्रीमेंट, व्होटर आयडी, टेलिफोन/इलेक्ट्रिसिटी/वॉटर बिल, पासपोर्ट, रेशन कार्ड, फ्लॅट अलॉटमेंट आणि पजेशन लेटर, हाऊस रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट, एलआयसी पॉलिसी, बँक/ क्रेडिट कार्डाचं स्टेटमेंट द्यावं लागणार आहे. तसेच आयडी प्रूफसाठी आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, व्होटर आयडी नंबर, ऑफिस आयडी कार्ड(राज्य आणि केंद्र सरकारद्वारे), ड्रायव्हिंग लायसन्स द्यावे लागणार आहे.
...अन्यथा तुमचं LPG गॅस कनेक्शन होईल रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 4:46 PM