नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने OTP शिवाय 15,000 रुपयांपर्यंत ऑटो डेबिट करण्याचा नियम लागू केला आहे. या नवीन नियमानुसार, 15,000 रुपयांपर्यंत पेमेंट केल्यास, तुम्हाला पडताळणी किंवा मंजुरीसाठी OTP टाकण्याची गरज नाही. आतापर्यंत 10 हजार रुपयांसाठी हा नियम लागू होता.
यापेक्षा जास्त रक्कम ऑटो डेबिट झाल्यास, युझरला व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपी टाकमे अनिवार्य होते. आता ही मर्यादा 5 हजार रुपयांनी वाढवून 15 हजारांवर नेल्याने युझरला मोठा दिलासा मिळणार आहे. या नियमात डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेट इत्यादीद्वारे पैसे भरणेही सामील करण्यात आले आहे.
अलीकडेच आरबीआयने आर्थिक धोरणाचा आढावा घेतल्यानंतर या नवीन नियमाची माहिती दिली होती. आता आरबीआयने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, या सुविधेबाबत लोकांमध्ये कुतूहलता वाढली आहे. आतापर्यंत या फ्रेमवर्क अंतर्गत 6.25 कोटींहून अधिक मँडेट रजिस्टर्ड करण्यात आले आहे. यामध्ये 3,400 हून अधिक आंतरराष्ट्रीय व्यापार्यांचा समावेश आहे. या सुविधेअंतर्गत मेसेज, ईमेल इत्यादीद्वारे पैसे भरण्याच्या दिवसाच्या 24 तास आधी बँकेला कळवणे आवश्यक आहे.