Lokmat Money > बिझनेस न्यूज > OTT प्लॅटफॉर्म Ullu Digital आतापर्यंतचा सर्वात मोठा SME IPO; ₹१५० कोटी उभारण्याचा प्रयत्न

OTT प्लॅटफॉर्म Ullu Digital आतापर्यंतचा सर्वात मोठा SME IPO; ₹१५० कोटी उभारण्याचा प्रयत्न

OTT प्लॅटफॉर्म Ullu Digital त्यांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने ड्राफ्ट पेपर्स बाजार नियामक सेबीकडे सादर केली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 02:10 PM2024-02-16T14:10:17+5:302024-02-16T14:12:23+5:30

OTT प्लॅटफॉर्म Ullu Digital त्यांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने ड्राफ्ट पेपर्स बाजार नियामक सेबीकडे सादर केली आहेत.

OTT platform Ullu Digital biggest ever SME IPO Efforts to raisers 150 crore draft papers submitted to sebi | OTT प्लॅटफॉर्म Ullu Digital आतापर्यंतचा सर्वात मोठा SME IPO; ₹१५० कोटी उभारण्याचा प्रयत्न

OTT प्लॅटफॉर्म Ullu Digital आतापर्यंतचा सर्वात मोठा SME IPO; ₹१५० कोटी उभारण्याचा प्रयत्न

OTT प्लॅटफॉर्म Ullu Digital त्यांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने ड्राफ्ट पेपर्स बाजार नियामक सेबीकडे सादर केली आहेत. कंपनीला आयपीओद्वारे १३५ ते १५० कोटी रुपये उभे करायचे आहेत. पब्लिक इश्यूमध्ये सुमारे 62.6 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. विक्रीसाठी कोणतीही ऑफर फॉर सेल असणार नाही. उल्लू डिजिटलला त्यांच्या आयपीओसाठी सेबीकडून मंजुरी मिळाल्यास, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा एसएमई आयपीओ असेल.

 

आत्तापर्यंत, देशातील सर्वात मोठा SME IPO स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटचा आहे. त्यांनी आयपीओद्वारे १०५ कोटी रुपये उभारले आहेत. चित्तोडगड डॉट कॉमकडून मिळालेल्या माहितीनुसार आशका हॉस्पिटल्सनं आयपीद्वारे १०१.६ कोटी रुपये, बावेजा स्टुडिओज आणि खजानची ज्वेलर्सनं प्रत्येकी ९७ कोटी रुपये आणि वाईज ट्रॅव्हल इंडियानं ९४.७ कोटी रुपये उभारले आहेत.
 

कोण आहेत उल्लूचे मालक?
 

उल्लू डिजिटल हे उल्लू ॲप/वेबसाइटद्वारे एन्टरटेन्मेंट कन्टेंट उपलब्ध करून देतं. यामध्ये वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स आणि शो यांचा समावेश आहे. विभू अग्रवाल आणि त्यांची पत्नी मेघा अग्रवाल हे कंपनीचे मालक आहेत. सध्या विभू आणि मेघा अग्रवाल यांची उल्लूमध्ये ९५ टक्के भागीदारी आहे. उर्वरित ५ टक्के हिस्सा पब्लिक शेअरहोल्डर जेनिथ मल्टी ट्रेडिंग डीएमसीसीकडे आहे.
 

कंपनी मुख्यत्वे आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर नवीन कन्टेंन्टच्या प्रोडक्शनसाठी, इंटरनॅशनल शो चे राईट्स घेण्यासाठी, तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी वापरेल. याशिवाय वर्किंग कॅपिटलच्या गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठीही या पैशांचा वापर केला जाईल.
 

रिझर्व्ह हिस्स्याची माहिती
 

आयपीओ क्लोझ झाल्यानंतर त्याचं लिस्टिंग बीएसई एसएमईवर होईल. आयपीओ अंतर्गत ३५ टक्के हिस्सा रिटेल इनव्हेस्टर्ससाठी, १५ टक्के हिस्सा नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स आणि ५० टक्के हिस्सा क्वालिफाईड इंस्टिट्युशनल बायर्ससाठी असेल. 

Web Title: OTT platform Ullu Digital biggest ever SME IPO Efforts to raisers 150 crore draft papers submitted to sebi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.