Lokmat Money > बिझनेस न्यूज > लबाडांना दाखविणार बाहेरचा रस्ता

लबाडांना दाखविणार बाहेरचा रस्ता

प्रदूषण नियंत्रण चाचणीतील लबाडीमुळे प्रतिष्ठेला लागलेला बट्टा पुसून काढण्यासाठी ‘फोक्सवॅगन’गांभीर्याने पावले उचलणार असून शुक्रवारी होणाऱ्या नियामककेला

By admin | Published: September 25, 2015 12:08 AM2015-09-25T00:08:15+5:302015-09-25T00:08:15+5:30

प्रदूषण नियंत्रण चाचणीतील लबाडीमुळे प्रतिष्ठेला लागलेला बट्टा पुसून काढण्यासाठी ‘फोक्सवॅगन’गांभीर्याने पावले उचलणार असून शुक्रवारी होणाऱ्या नियामककेला

Outdoors road to the looters | लबाडांना दाखविणार बाहेरचा रस्ता

लबाडांना दाखविणार बाहेरचा रस्ता

बर्लिन : प्रदूषण नियंत्रण चाचणीतील लबाडीमुळे प्रतिष्ठेला लागलेला बट्टा पुसून काढण्यासाठी ‘फोक्सवॅगन’गांभीर्याने पावले उचलणार असून शुक्रवारी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत प्राथमिक चौकशीचा निष्कर्ष जारी केला जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच मार्टिन विंटरकॉर्न यांचा उत्तराधिकारी ठरविला जाणार आहे. यासोबतच व्यवस्थापनात मोठे फेरबदल करून लबाडीस जबाबदार असलेल्यांना बाहेरचा रस्ताही दाखविण्यात येणार आहे.
या लबाडीचा पर्दाफाश करण्यात अमेरिकेतील एका भारतीय अभियंत्याच्या संशोधनाने मोलाची कामगिरी बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण चाचण्यांचे निष्कर्ष धूळफेक करणारे येतील, अशा प्रकारची सॉफ्टवेअर प्रणाली अंतर्भूत करून जगभरातील ग्राहकांशी करण्यात आलेली लबाडी जगजाहीर झाल्याने फोक्सवॅगनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्टिन विंटरकॉर्न यांना राजीनामा द्यावा लागला
होता.
प्रदूषण चाचणीचे निष्कर्ष फसवे येतील, अशा प्रकारचे सॉफ्टवेअर बसवून गेल्या पाच वर्षांत सदोष डिझेल मोटारी विकण्यात आल्या. या लबाडीचे धागेदोरे शोधून यासाठी कोण-कोण जबाबदार आहेत, याचा छडा लावण्यासाठी फोक्सवॅगनने तातडीने अंतर्गत चौकशी सुरू केली. या चौकशीचा प्राथमिक निष्कर्ष शुक्रवारी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

Web Title: Outdoors road to the looters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.