Air India मधील १५०० वैमानिकांनी टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी रिव्हाईज सर्विस एग्रीमेंट आणि अपडेटेड सॅलरी स्ट्रक्चरवरुन ह्युमन रिसोर्स विभागासोबत चर्चा सुरू आहे. वैमानिकांनी त्यांच्या समस्या एचआर विभाग ऐकत नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे यात रतन टाटा यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी वैमानिकांनी केली आहे.
या पत्रात वैमानिकांनी लिहिले आहे की, आम्ही एचआर विभागासमोर कठीण परिस्थितीचा सामना करत आहोत. आम्हाला वाटते की एअर इंडियाचे कर्मचारी या नात्याने आम्हाला हवा तसा आदर आणि सन्मानाने वागवले जात नाही. त्यामुळे आमचे मनोबल कमी झाले असून आम्ही चिंतेत आहोत. आपल्या कर्तव्य बजावण्याच्या क्षमतेवर याचा विपरीत परिणाम होईल, असंही यात म्हटले आहे. या पत्रावर एकूण १,५०४ वैमानिकांनी स्वाक्षरी केली आहे.
१७ एप्रिल रोजी Air India ने वैमानिकांसाठी आणि केबिन क्रूसाठी एक नवे सॅलरी स्ट्रक्चरची घोषणा केली. यामध्ये वैमानिकांचा उड्डाण भत्ता दुपटीने वाढवून ४० तास करण्यात आला. याशिवाय वैमानिकांना सेवा वर्षांच्या आधारे बक्षीस दिले जाईल, असे सांगण्यात आले. दोन पायलट युनियन - इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) आणि इंडियन पायलट गिल्ड (IPG) यांनी सुधारित वेतन संरचना आणि सेवा करारावर निराशा व्यक्त केली आहे.
एअर इंडिया (Air India), एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरएशिया इंडिया या पूर्णपणे टाटा सन्सच्या मालकीच्या आहेत. विस्तारा हा टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा 51:49 चा संयुक्त उपक्रम आहे. एअर इंडिया एक्सप्रेस सध्या एअरएशिया इंडियामध्ये विलीन होण्याच्या प्रक्रियेत आहे जेणेकरून एअर इंडियाची कमी किमतीची उपकंपनी असेल. याव्यतिरिक्त, एअर इंडिया स्वतः विस्तारामध्ये विलीन होण्याच्या प्रक्रियेत आहे.